नाशिक – नाशिक-मुंबई महामार्गाची अतिशय बिकट स्थिती झाली असून या महामार्गावरून मार्गक्रमण करणे जिकिरीचे ठरत आहे. सुमारे २०० किलोमीटरच्या रस्त्यावर केवळ एक जेसीबी आणि पाच कर्मचारी खड्डे बुजविण्याचे काम करतात. इतक्या संथपणे हे काम सुरू असल्याची बाब आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेकडे फरांदे यांनी अधिवेशनात लक्ष वेधले. रस्त्याचे निकृष्ट काम आणि दुरुस्तीत हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून या प्रश्नी उपमुख्यमंत्र्यांनी बैठक बोलविण्याची मागणी त्यांनी केली. त्यास प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधींची स्वतंत्र बैठक या विषयावर घेण्याची ग्वाही दिली. विधानसभा अधिवेशनात फरांदे यांनी नाशिक-मुंबई महामार्गाची सद्यस्थिती मांडली. महामार्गाची चाळण झाली असताना खड्डे बुजविण्याचे काम संथपणे होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी त्यांनी केली.

हेही वाचा – डॉक्टरांची कमाल! रुग्णाला शुद्धीवर ठेवून गुंतागुंतीची मेंदू शस्त्रक्रिया

हेही वाचा – पुणे : नेट-सेट, पीएच.डी धारक रस्त्यावर; सत्याग्रहाला सुरुवात

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियमानुसार कार्यवाही करण्याचे प्रशासनाला आदेश दिले. दरम्यान, या संदर्भात फरांदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पत्र दिले. त्या अनुषंगाने पुढील काही दिवसांतच नाशिक-मुंबई महामार्गाच्या विषयावर स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the nashik mumbai highway about 200 km of the road only one jcb and five personnel are working to fill the potholes ssb
Show comments