नाशिक: दिवाळीच्या सुट्टीनिमित्त अनेकांची पाऊले पर्यटनासाठी बाहेर पडली असून नाशिककर भटकंतीसाठी कोकण, केरळला पसंती देत असताना धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागातून पर्यटक नाशिकमध्ये येत असल्याने पर्यटकांमुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर गर्दीने ओसंडून वाहत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दिवाळीनिमित्त महिलांनाही वर्षभरातील कामाच्या रहाटगाड्यातून तीन-चार दिवस का होईना थोडा निवांतपणा मिळतो. हा निवांतपणा निसर्गाच्या सान्निध्यात, धार्मिक ठिकाणी घालवता यावा, यासाठी अनेक कुटूंब पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. यंदा दिवाळीच्या सुट्या कमी असल्या तरी बहुसंख्य जण लक्ष्मीपूजन, पाडवा होताच घराबाहेर पडले. आपआपल्या आर्थिक क्षमतेचा विचार करत पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली. पर्यटनासाठी कुठे जायचं, यावर घरातील सर्व सदस्यांची वेगवेगळी मतांतरे राहत असल्याने त्यातून सर्वांना योग्य होईल, असे स्थळ निवडण्यात येते. अर्थात, यासाठी घरातील मुलांचा अधिक विचार केला जातो. त्यांना आनंद मिळावा म्हणून ते सुचवतील ते पर्यटनस्थळ प्रामुख्याने निश्चित केले जाते.
हेही वाचा… नाशिक: रोजगाराच्या नावाखाली ११ लाखांना गंडा
दिवाळीत साफसफाई, फराळ करणे, यात महिलांची अधिक धावपळ होते. या दगदगीतून मुलांसह काही दिवस बाहेर राहणे, सर्वांनाच आवडते. त्यात घरातील कर्त्या व्यक्तीची साथ असल्यास नियोजन त्वरीत होते. सुट्या कमी असल्याने दूरच्या ठिकाणी जाऊन प्रवासातच अधिक दगदग करुन घेण्यापेक्षा अलीकडे नाशिककर आपल्या जिल्ह्यातीलच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरातील रिसोर्ट, भाड्याने मिळणाऱ्या बंगल्यात एक-दोन दिवसांसाठी राहणे पसंत करु लागले आहेत. मुंबई, पुणेसह राज्याच्या इतर भागातूनही इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसारख्या निसर्गरम्य आणि धार्मिक ठिकाणी मुक्काम करण्यास प्राधान्य देऊ लागल्याने यंदाच्या दिवाळी सुट्टीत नाशिक परिसर पर्यटकांनी गजबजून गेला आहे. ऋतू कोणताही असला तरी, नेहमीप्रमाणे पर्यटकांच्या प्राधान्यक्रमावर कोकण एक नंबरवर असल्याचे दिवाळी सुट्टीतही दिसून आले. राज्याबाहेर केरळ, अंदमानसह राजस्थानला पसंती मिळाली आहे. यासाठी साधारणत: एका व्यक्तीला यासाठी चार ते पाच दिवसांचा खर्च ३५ ते ४० हजार रुपये येत आहे.
काही नामांकित विमान कंपन्यांच्या नाशिकच्या फेऱ्या बंद झाल्या आहेत. परिणामी, मुंबईला जाऊन परदेशात इतरत्र जाण्यासाठी विमानसेवा करावी लागत असल्याने आर्थिक भारही वाढत आहे. असे असले तरी अनेक पर्यटक आंतरराष्ट्रीय पर्यटनाला पसंती देत असून त्यात सिंगापूर, थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, कंबोडिया, दुबई ही नाशिककरांची आवडीची ठिकाणे असल्याचे पर्यटन व्यावसायिक दत्ता भालेराव यांनी सांगितले.