नाशिक :नाशिक टपाल विभागात जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने येथील मुख्य डाकघरापासून ‘नाशिक पोस्टमन वॉक’ अंतर्गत फेरी काढण्यात आली. या फेरीत शहरातील सर्व पोस्टमन, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या फेरीसाठी ‘फिट पोस्ट, फिट इंडिया’ हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फेरीत भारतात टपाल सुविधा सुरू झाली तेव्हाचे ‘हरकारा’, तसेच ‘ब्रिटिशकालीन पोस्टमनचे’ प्रतीकात्मक रूप दाखविण्यात आले. त्याचबरोबर पोस्टमनच्या कामकाजात वेळोवेळी झालेली स्थित्यंतरे, नव्या युगातील ‘डिजिटल’ पोस्टमनपर्यंतचे बदल छान पद्धतीने दाखविण्यात आले. टपाल कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहितीही ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात आली. अशा प्रकारचा उपक्रम नाशिक विभागात प्रथमच राबविला गेल्याने ‘नाशिक पोस्टमन वॉक’ सर्वांसाठी चर्चेचा विषय झाला. सदरचे नियोजन नाशिक विभाग डाकघराचे प्रवर अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.