लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: वाहनाची चाचणी घेण्याच्या बहाण्याने संशयिताने २० लाख रुपयांची इलेक्ट्रिक मोटार पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. पाच ते सहा तास उलटूनही संशयित न परतल्याने कार मॉल चालकाला पोलिसांकडे धाव घ्यावी लागली. याबाबत कपिल नारंग (सिरीन मेडोज, गंगापूररोड) यांनी तक्रार दिली.

नारंग यांचे पाथर्डी फाटा परिसरात कार मॉल नावाचे दालन आहे. इलेक्ट्रिक कार खरेदीचा बहाणा करून मनोज साळवे ही व्यक्ती दालनात आली. विविध मोटारींची किंमत आणि माहिती त्याने घेतली. १९ लाख रुपयांची इलेक्ट्रिक मोटार पसंत केली. यावेळी त्याने वाहन चालवून पाहण्याची इच्छा व्यक्त केल्याने नारंग यांनी मोटार त्याच्या ताब्यात दिली.

हेही वाचा… नाफेड कांदा खरेदीत घोटाळा, उत्पादक संघटनेचा आरोप

संशयित चाचणीसाठी मोटार घेऊन गेला, तो परतलाच नाही. काही तासानंतर नारंग यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the pretext of testing the vehicle the suspect stole an electric car worth rs 20 lakh in nashik dvr