जळगाव – भुसावळ शहरातील विविध रस्त्यांवर चक्क चार्ली चॅप्लीन उतरल्याचे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. ज्युनिअर चार्ली म्हणून ख्यात असणारे अभिनेते सुमित पंडित यांनी पोलिसांच्या मदतीने केलेली अनोखी जनजागृती ही लक्षवेधी ठरली.सुरक्षितता पाळा अपघात टाळा असा संदेश देत भुसावळ शहर पोलिसांच्या वतीने भुसावळ येथील गांधी चौकासह विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली. ज्युनिअर चार्ली फाउंडेशन व सुलक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यातर्फे महाराष्ट्रभर जनजागृती मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत भुसावळ शहरात वाहतुकीच्या नियमांबाबत जनाजागृती मोहीम राबविण्यात आली. भुसावळकरांना अपघात टाळण्यासाठी फलक, हेल्मेटविषयी जनजागृती करण्यात आली. ज्या वाहनधारकांनी हेल्मेट घातले होते, त्यांचा पुष्पगुच्छ देऊन पोलिसांच्या वतीने सन्मान करण्यात आला. ज्या वाहनधारकांनी हेल्मेट घातले नव्हते, त्यांचे ज्युनिअर चार्ली यांनी मुके घेतले, तसेच रिफ्लेक्टर, रेडियम लावण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा