लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

धुळे: शहरवासीयांना हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असून आश्वासने देऊन महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप धुळेकरांची बोळवण करीत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीतर्फे मंगळवारी महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. पाणी समस्येवर १५ दिवसात उपाय योजना न झाल्यास साखळी उपोषण सुरु करू, असा इशारा यावेळी शिष्ठमंडळाने दिला.

आझाद समाज पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे, जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे संघटक शंकर खरात, युवती सामाजिक कार्यकर्त्या पूनम शिरसाठ, रिपाइं नेत्या नयना दामोदर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा धडकला. शहरात आठ ते बारा दिवस नळांना पाणी येत नाही. जे येते तेही अत्यंत अशुद्ध, गढूळ आणि गाळमिश्रित असते. काही ठिकाणी तर हंडाभर पाणी मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. अक्कलपाडा पाणी योजनेचे पाणी आज मिळेल, उद्या मिळेल, अशी खासदार डॉ. सुभाष भामरे आणि मनपातील सत्तेवर नियंत्रण ठेवणारे भाजप शहराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिलेली आश्वासने अक्षरशः भूलथापा ठरली आहेत.

हेही वाचा… नाशिक: जिल्हा नियोजन बचत निधीचा वाद शीगेला; अनियमिततेच्या चौकशीची राष्ट्रवादी आमदारांची मागणी, नियोजन विभाग अप्पर मुख्य सचिवांकडे तक्रार

अग्रवाल हे आठवड्यात दिवसाआड पाणी येईल, असे म्हणतात तर, खासदार भामरे हे जूनअखेर पाणी येईल, असे म्हणतात. धुळेकरांना मुद्रांकावर लिहून कधी पाणी पुरवठा होईल ते जाहीर करावे, असे आवाहन मोर्चेकऱ्यांतर्फे करण्यात आले आहे. सत्ताधार्‍यांनी या कामाच्या ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणावर दलाली घेतली असल्याचा आरोपही करण्यात आला. हे आंदोलन एकट्यादुकट्या कुठल्या पक्षाचे नसून धुळेकरांचे आहे. महापालिका प्रवेशद्वारासमोर फलकाव्दारे जनभावना व्यक्त करताच दादागिरी करून ते काढून टाकत जनभावनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. कुणीही जनतेच्या प्रश्नांवर बोलायचे नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.