लोकसत्ता वृत्त विभाग

पिंपळगाव बसवंत: मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाटा शिवारात जवळपास दीड हजार किलो गोमांस घेऊन जाणारे पिकअप वाहन पकडण्यात पिंपळगाव पोलिसांसह गोरक्षकांना यश आले. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पिकअप वाहनासह जवळपास सव्वा चारलाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
youth attacked police Mumbai, youth obstructed traffic ,
मुंबई : वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाचा पोलिसावर हल्ला, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल
Contractor fined Rs 1.5 lakh for poor road work in Andheri
अंधेरीतील रस्त्याच्या निकृष्ट कामाप्रकरणी कंत्राटदाराला दीड लाख रुपये दंड
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
MRTP, illegal building, Adivali Dhokali,
कल्याणमधील आडिवली-ढोकळीत बेकायदा इमारतीच्या विकासकांवर ‘एमआरटीपी’चा गुन्हा

चांदवडकडून नाशिकच्या दिशेने गोमांस घेऊन जाणारे वाहन रात्रीच्या सुमारास शिरवाडे फाटा परिसरातून जाणार असल्याची माहिती पिंपळगाव पोलिसांना गो रक्षकांनी दिली. या आधारे पोलिसांनी तातडीने शिरवाडे फाटा व पिंपळगाव टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्तात वाढ केली. शिरवाडे फाटा परिसरात रात्री भरधाव सफेद रंगाचे बोलेरो पिकअप वाहन जात होते. या वाहनाची तपासणी केली असता त्यात गोमांस आढळून आले.

हेही वाचा… ईडी व भाजपा सरकारच्या धोरणांविरोधात निषेध आंदोलन; चंद्रपूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर

चालक रहीम शेख सरफुद्दीन शेख (३०, आझाद नगर, धुळे) याच्या विरुध्द पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडुन सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे दीड हजार किलो गोमांस, दोन लाखाची पिकअप वाहन असा जवळपास चार लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे अधिक तपास करत आहे.

Story img Loader