नाशिक – शहर परिसरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने वेगवेगळ्या कारवाया करण्यात येत आहेत. तरीही गुन्हेगारी नियंत्रणात येत नसल्याने आता गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी नागरिकांचे सहकार्य घेण्यात येत आहे. शहर परिसरात एक कॅमेरा पोलिसांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांना सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहर परिसरात सातत्याने सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, दुचाकींची तोडफोड, गाड्यांची जाळपोळ, लूटमार, असे प्रकार होत आहेत. काही वेळा महिलांनाही अत्याचाराला तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सातत्याने गस्त ठेवली जाते. मात्र कमी मनुष्यबळ किंवा अन्य काही कारणांमुळे ही व्यवस्था पुरेशी ठरत नसल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक कॅमेरा पोलिसांसाठी असे आवाहन करण्यात आले आहे. याअंतर्गत शहर परिसरातील हॉटेल व्यावसायिक, मंगल कार्यालये, निवासी परिसर, शाळा-महाविद्यालये यांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शहर परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत.

हेही वाचा – संगीता बोरस्ते यांचा वसंतराव नाईक पुरस्काराने गौरव

याविषयी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी माहिती दिली. पोलीस आयुक्त शिंदे यांच्या संकल्पनेतून एक कॅमेरा पोलिसांसाठी हा उपक्रम सध्या सुरू आहे. शहर परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन क्लिष्ट गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होत आहे. सातपूर येथे अलीकडेच विवाहित महिलेची गळा चिरून हत्या झाली. या गुन्ह्याचा उलगडा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणामुळे झाला. नाशिक शहर परिसरात आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे बच्छाव यांनी नमूद केले.