लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: शहराप्रमाणेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये आता वाढ होऊ लागली असून येवला तालुक्यातील देवळाणे येथे भ्रमणध्वनी दुकानातून भ्रमणध्वनींसह रोख रक्कम असा सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य दोन जण पळून गेले.
संशयितांनी भ्रमणध्वनी दुकानात चोरी करत रोख रक्कम असा एक कोटी पाच लाख रुपये लुटणाऱ्या टोळीतील एका संशयिताला पोलीसांनी अटक केली असून अन्य दोन संशयित फरार आहे. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवला तालुक्यातील देवळाणे येथे सुनील खोकले यांचे भ्रमणध्वनी दुकान आहे. त्यांच्या दुकानात संशयित संजय शिंदे (१८, रा. संजय गांधी नगर), आकाश गायकवाड (रा. उकलगांव) आणि करण हे तिघे खोकले यांच्या घराजवळ चारचाकी वाहनाने आले.
हेही वाचा… वाळूमाफियाकडून महिला मंडळ अधिकार्यास धक्काबुक्की; जळगाव जिल्ह्यातील घटना
खोकले यांना चाकूचा धाक दाखवित दोन्ही दुकानांमधील भ्रमणध्वनी तसेच रोख रक्कम असा एक कोटी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयितांचा पाठलाग करीत संजय शिंदे यास ताब्यात घेतले. अन्य दोन संशयित फरार असून या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.