नाशिक : शहरात एकाच दिवसात एक लाख नऊ हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकच्या वतीने ही कामगिरी करण्यात आली. गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचारी यांची पथके तयार करण्यात आली असून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पथकांना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : नाशिक : हॉटेलमधील नोकरावर बंदूक रोखणाऱ्या पोलिसाचे निलंबन ?

अंबड पोलीस ठाणे हद्दीत पवननगर येथील गणपती मंदिराजवळ संतोष चव्हाण याच्या ताब्यातून ५५ हजार रुपयांचा तर, पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत पेठरोड येथून आतिश बोडके (२५, रा. फुलेनगर) याच्या ताब्यातून ४४ हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला. तिसऱ्या कारवाईत वडाळा येथील गरीब नवाज कॉलनी परिसरातून शेख मोहसीन (१९, रा. वडाळा) याच्याकडून १० हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला. संशयितांविरुध्द अंबड, पंचवटी तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader