लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: अनेक तालुक्यांमध्ये शासन आपल्या दारी उपक्रमातील लाभार्थ्यांची संख्या कमी आहे. या कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांची संख्या किमान १० लाख असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आठ लाख ९१ हजारच्या आसपास लाभार्थी आहेत. १० लाखाचे लक्ष्य गाठण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन अधिकाधिक योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Child dies after falling into sinkhole in nashik
नाशिक : शोषखड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू
Elgar Sanghatanas march in Trimbak for houses
नाशिक : घरांसाठी त्र्यंबकमध्ये एल्गार संघटनेचा मोर्चा
Nashik Mandal of mhada is not getting houses from private developers under 20 percent scheme
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ५५५ घरांसाठी सोडत २० टक्के योजनेतील घरे, आठवड्याभरात जाहिरात
181 people life saved from organ donation highest rate of kidney transplants
अवयवरूपी दानामुळे १८१ जणांना मिळालं जीवदान! मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे प्रमाण सर्वाधिक
Nashik flats MHADA, MHADA,
नाशिक : म्हाडाकडून नव्याने ५५५ सदनिकांचे वितरण

गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानावर सकाळी ११ वाजता शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमिवर, कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदी उपस्थित होते. सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, देवळा, नांदगाव, इगतपुरी आणि येवला तालुक्यात लाभार्थ्यांची संख्या असमाधानकारक असल्याचे उघड झाले. हा धागा पकडून भुसे यांनी पुढील दोन-तीन दिवसात किमान १० लाखाचे लक्ष्य गाठण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावोगावी जावून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचे सूचित केले.

आणखी वाचा-नाशिक: बागलाणमधील टंचाईग्रस्त गावांसाठी टँकरची व्यवस्था

लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी राज्य परिवहनच्या बससेवेचे नियोजन करून प्रत्येक बसमध्ये ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांच्यावर समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवावी. जेणेकरून लाभार्थ्यांना आणणे आणि परत घेऊन जाणे सोयीचे होईल. कार्यक्रमस्थळी व वाहनतळाच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिकांची व्यवस्था करावी. लाभार्थ्यांसाठी दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था, कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी यांचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. बैठकीनंतर पालकमंत्री भुसे यांनी डोंगरे वसतिगृह मैदान या कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी कार्यक्रमासाठी तयार करण्यात येणारी मंडप व्यवस्था, विविध शासकीय कार्यालयांचे कक्ष, लाभार्थ्यांची आसन व्यवस्था याबाबत चर्चा केली.

बैठकीकडे आमदारांची पाठ

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या नियोजनपूर्व बैठकीत सर्वपक्षीय आमदारांनी पाठ फिरविल्याचे दिसले. ही बैठक सोमवारी सायंकाळी पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. परंतु, ते धुळ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अडकले. त्या कार्यक्रमास उशिर झाल्याने ही बैठक एक दिवस पुढे ढकलण्यात आली. बैठकीचे वेळापत्रक बदलल्याने अनेक आमदार या बैठकीला आले नाहीत. यात राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्ह्यातील या पक्षाचे सर्व आमदार, भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर, शिवसेनेचे सुहास कांदे आदींनी बैठकीकडे पाठ फिरवली. यावर पालकमंत्र्यांनी काही कामानिमित्त आमदारांना शक्य झाले नसेल. शासन आपल्या दारी हा सर्वांचा कार्यक्रम असून तो यशस्वी करणे सामूहिक जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा- पालकमंत्री ठरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा, दादा भुसे यांचा निर्वाळा

वाहतूक मार्गात बदल होणार

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री आणि जिल्ह्यातील लाभार्थी शहरात येणार आहेत. त्या दिवशी वाहतूक मार्गात बदल करावा लागणार असून स्थानिकांची काहिशी गैरसोय होईल. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिककरांनी सहकार्य करावे, असे आवाहन भुसे यांनी केले.

Story img Loader