सार्वजनिक वाचनालयाच्या नियमात ३० वर्षांनंतर बदल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिक : वाचनाची आवड असली तरी सवड असेल असे नाही. त्यामुळे वाचनालयातून पुस्तके आणली तरी ती दिवाणखान्यात किंवा एखाद्या टेबलावर धूळ खात पडून असतात. या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना)च्या वतीने अशा वाचकांना वाचनाची नियमित सवय लागावी यासाठी दंडात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसाला २० पैसे असणारा दंड आता एक रुपया करण्यात येणार आहे. तसेच भ्रमणध्वनी अॅपसह अन्य माध्यमातूनही वाचकांना याविषयी माहिती देण्यात येणार आहे.
शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून सध्या १० हजारांहून अधिक वाचक वाचनसंस्कृतीशी जोडले गेले आहेत. वाचनालयाच्या वतीने वाचकांची अभिरुची जपली जावी यासाठी विविध विषयांशी संबंधित पावणेदोन लाख पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सार्वजनिक वाचनालयाकडून कुठलेही एक पुस्तक किंवा मासिक जमा करण्यासाठी वाचकाला १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. बऱ्याचदा वाचकांकडून वेळ नसल्याने किंवा अन्य अडचणींमुळे पुस्तके वेळेत परत केली जात नाहीत. काही वेळा एखादे पुस्तक वर्षभर वाचकाकडेच राहते. अशा स्थितीत तेच पुस्तक अन्य वाचकाला वाचण्यासाठी मिळत नाही. ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी वाचनालयाकडून आतापर्यंत मुदतीत पुस्तक जमा न करणाऱ्यांना प्रति दिवस २० पैसे दंड आकारला जात होता. तीस वर्षांपासून ही दंडात्मक रक्कम कायम आहे. नुकताच वाचनालयाने दंडात्मक रक्कम वाढविण्याचा निर्णय घेतला असून नवीन वर्षांत अर्थात एक जानेवारीपासून ही रक्कम प्रति दिवस एक रुपया राहणार असल्याचे पत्रक वाचनालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. वाचनालयाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी वाचनालयातील जुन्या पुस्तकांच्या किमती पाहता २० पैसे दंड योग्य होता, परंतु आता पुस्तकांच्या किमती वाढल्या असल्याचा मुद्दा मांडला. दंडात्मक रक्कम वसूल करताना सुट्टय़ा पैशांचा प्रश्न निर्माण होत असे. मुळात वाचकांकडून दंड वसूल करण्याऐवजी त्यांना नियमित पुस्तके परत करण्याची सवय लागावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे बेणी यांनी सांगितले. वाचकांना पुस्तक वेळेत परत करण्याची आठवण करून देण्यासह अन्य उपक्रमांची माहिती देण्यासाठी वाचनालयाकडून अॅप विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून वाचनालयात कोणती पुस्तके उपलब्ध आहेत, त्याची यादी वाचकाच्या भ्रमणध्वनीवर उपलब्ध असेल. याशिवाय वाचनालयाकडून कोणते नवीन उपक्रम घेण्यात येत आहेत, व्याख्याने, कार्यशाळा याची माहिती दिली जाईल. नवीन सभासद व्हायचे असेल तर ऑनलाइनही सेवा देण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात हे अॅप वाचकांच्या भ्रमणध्वनीत राहील, अशी माहिती देण्यात आली.