नाशिक – कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केल्यामुळे जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमध्ये हजारो क्विंटल कांद्याचे व्यवहार थांबले आहेत. या निर्णयाची माहिती नसल्याने जिथे सकाळी शेतकरी माल घेऊन आले, त्या विंचूर, पिंपळगावसह अन्य काही समितींत लिलाव झाले. लासलगाव बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट होता. जिल्हा प्रशासन सोमवारी व्यापारी संघटनेशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यास यश न आल्यास कायदेशीर कारवाईचा विचार करणे क्रमप्राप्त ठरणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केंद्र सरकारने कांद्यावर अकस्मात निर्यात शुल्क लागू करताना स्पष्टता केली नसल्याने परदेशात जाणारा माल बांग्लादेश सीमा व बंदरात अडकून पडला आहे. या निषेधार्थ सोमवारपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचे जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने जाहीर केले होते. त्याचे परिणाम पहिल्याच दिवशी घाऊक बाजारात दिसून आले. काहींना या निर्णयाची कल्पना नव्हती. त्यामुळे विंचूर उपबाजार आणि पिंपळगाव बसवंत येथे काही शेतकरी टेम्पोत कांदा घेऊन आले होते. लिलावाअभावी त्यांना माल परत नेण्याची वेळ येऊ नये म्हणून व्यापाऱ्यांनी संबंधितांच्या मालाचे लिलाव केले. तथापि, हे प्रमाण अतिशय कमी होते. जिल्ह्यात सध्या दैनंदिन ६० ते ७० हजार क्विंटल कांद्याची आवक होते. लिलावातून कोट्यवधींची उलाढाल होते. आवक व उलाढाल पूर्णत: थंडावली आहे. कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजारात दैनंदिन १५ ते २० हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन दीड ते दोन कोटींची उलाढाल असते. या समितीत शुकशुकाट होता. कुणी कांदे विक्रीसाठी आले नाही. विंचूर उपबाजारात १०८ वाहनांचे लिलाव झाल्याचे समितीकडून सांगण्यात आले. पिंपळगाव बाजारात सकाळी तसे लिलाव झाले. व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे नियमित लिलाव ठप्प झाले आहे.

हेही वाचा – नंदुरबार: बिरसा मुंडा रस्ता जोड योजनेतून १७ जिल्ह्यांत रस्ते निर्मितीचे नियोजन

मागणी वाढलेली असताना कांदा लिलाव बंद राहिल्याने देशाअंतर्गत वितरणाची साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नाशिकमधून देशातील सर्व भागांत कांदा पाठविला जातो. लिलाव बंद राहिल्यास त्यावर परिणाम होऊ शकतो. निर्यात शुल्काबाबतच्या निर्णयाची स्पष्टता झाल्यानंतर व्यापारी आपली भूमिका बदलतील. सकाळी काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव झाले, असे जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल, पोलीस सक्रिय; जळगावात ६७ वाहने जमा

…तर व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

जिल्हा प्रशासनाने व्यापारी संघटनेला चर्चेसाठी बोलावले आहे. कुठलीही नोटीस न देता व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद केले. जिल्हा उपनिबंधकांमार्फत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. चर्चेतून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न असून तसे न झाल्यास व्यापाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा विचार करणे क्रमप्राप्त ठरेल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.