मनमाड : निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांदा दरात घसरण सुरूच आहे. गेल्या १५ दिवसांत कांद्याचे भाव क्विंटल मागे ११०० ते १२०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाल कांद्याला सरासरी २७०० ते २८०० रुपये क्विंटल भाव होता. केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि तेंव्हापासून बाजारात कांद्याचे भाव कोसळत आहेत. १००० ते १५०० रुपये दराने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

१५ दिवसांत कांदा निम्म्याहून अधिक कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल आणि सफेद कांद्याची २३४ नग इतकी आवक झाली. लाल कांद्याला ५०० ते १७११ सरासरी १५०० रुपये क्विंटल तर सफेद कांद्याला ४५२ ते ११०० सरासरी ९८० रुपये क्विंटल असा भाव होता. मक्याची ३२ नग आवक होऊन १९५१ ते २३११ सरासरी २०७५ रुपये प्रतिक्विंटल असे मक्याचे भाव होते. मका बाजार भाव सध्या स्थिर आहेत तर कांद्याचे भाव मात्र घसरणीला लागले आहेत. घाऊक बाजारात कांदा वधारल्याने शेतकर्यांची आशा पल्लवीत झाली होती. पण निर्यात बंदी जाहीर झाली आणि कांद्याच्या भावाला ग्रहण लागले ते अद्यापपर्यंत कायम आहे. त्यानंतर सातत्याने कांद्याचे भाव गडगडत आहेत.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात

हेही वाचा… त्र्यंबकेश्वरमध्ये करोनाचा रुग्ण, सिन्नरमध्ये दोन संशयित

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठीच आमचा लढा, मनोज जरांगे पाटील आक्रमक

लासलगाव बाजार समितीत आठ हजार १९२ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्याला सरासरी दीड हजार रुपये दर मिळाला. आदल्या दिवशीच्या तुलनेत १०० रुपयांनी दर कमी झाले. अनेक बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक जवळपास थांबली आहे. आता नवीन लाल कांदा बाजारात येत आहे. या कांद्याची साठवणूक करता येत नाही. तो काढणीनंतर लवकर विक्रीस न्यावा लागतो. त्यामुळे दर घसरलेले असतानाही तो विकण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी सांगतात.