लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दिंडोरी तालुक्यातील वणी येथे कांदे , टॉमॅटो फेकण्यात आल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. संबंधितांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.

pimpri chinchwad municipal corporation news
पिंपरी : शहराची लोकसंख्या ३० लाख आणि पहिल्या लोकशाही दिनात केवळ दोन तक्रारी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
सतीश आळेकर यांना ‘जनस्थान’; १० मार्च रोजी नाशिकमध्ये पुरस्काराने गौरव
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी
Supriya Sule in audience in Ajit Pawar event
नाराजीनाट्याचा पुढचा अंक इंदापुरात! नक्की काय घडले ? अजित पवार व्यासपीठावर तर खासदार सुप्रिया सुळे प्रेक्षकांत
Yashomati Thakur warned that distributing trishuls could lead to violence and threaten law and order
अमरावती जिल्ह्यात काही संघटनाकडून शस्त्रांचे वाटप, यशोमती ठाकूर यांचा आरोप
Rohit Pawar , Davos , Industries offices Maharashtra,
उद्योगांची कार्यालये महाराष्ट्रात, मग करारासाठी दावोसला जाण्याची काय गरज – रोहित पवार यांचा प्रश्न
Ajit Pawar on dowry
Ajit Pawar : सामूहिक लग्न सोहळ्यामुळे हुंड्यासारख्या प्रथा बंद होतात – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवार हे पक्षीय दृष्टीने प्रथमच नाशिक दौऱ्यावर आले आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दादांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शनिवारी सकाळी विमानाने ते ओझर विमानतळावर उतरल्यावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. सत्तेत सहभागी होताना साथ देणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी ते मार्गस्थ होत असताना वणी परिसरातील बिरसा मुंडा चौकात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्याची माहिती शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी दिली. काही दिवसांपासून टोमॅटोला भाव मिळेनासा झाला आहे. ६० ते ७० रुपये जाळी (२० किलो क्रेट) दराने शेतकऱ्यांना टोमॅटो विकावे लागत आहेत. दुसरीकडे कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावून दर पाडण्यात आले. सरकारच्या शेतकरी विरोधी कार्यशैलीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… नाशिक उपकेंद्रांच्या वाढीव बांधकामासाठी तीन कोटी मंजूर; संकुलात अनेक अभ्यासक्रम सुरू होणार

दरम्यान, या प्रकाराने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. एक ते दीड महिन्यांपासून स्थानिक पातळीवर कांद्याचा प्रश्न गाजत आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात असे काही घडू शकते, याची कल्पना यंत्रणेला कशी आली नाही, असा प्रश्न अजित पवार समर्थक विचारत आहेत. अजित पवार यांच्या हस्ते दिंडोरी मतदार संघात अवनखेड येथील भक्त निवासाचे भूमीपूजन होणार आहे. दुपारी कळवण येथील साई लॉन्स येथे शेतकरी आणि कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या पुढाकारातून हा मेळावा होत आहे. कळवणमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी भेट देऊन दुपारी ते सह्याद्री ॲग्रो फार्म हाऊसमध्ये जातील. सायंकाळी राष्ट्रवादी भवन येथे शहर आणि ग्रामीणच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. आपणास साथ देणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात आवर्जुन भेट देणाऱ्या अजितदादांना इतर ठिकाणीही शेतकऱ्यांच्या रोषाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Story img Loader