कुंदा बच्छाव यांचा स्टेप टू ग्लोबल उपक्रम

नाशिक :  करोना संकटामुळे शालेय वर्ग सुरू नसल्याची कोणतीही पर्वा न करता विद्यार्थ्यांना नावीण्यपूर्ण असे काही देण्याची इच्छा शिक्षकांमध्ये असली तर काय करता येऊ शकते हे  महापालिका शाळा  क्र मांक १८ च्या प्रयोगशील शिक्षिका कुं दा बच्छाव यांनी दाखवून दिले आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा बच्छाव यांनी ग्वाटेमाला या देशातील शिक्षिका आणि विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद घडवून आणला.

सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान कसे प्राप्त होईल यासाठी बच्छाव या  वेगवेगळे प्रयोग करत असतात. विद्यार्थ्यांना इतर देशांविषयी अधिक माहिती मिळावी यासाठी स्टेप टू ग्लोबल उपक्र म सुरू करण्यात आला आहे.

या अंतर्गत भारतातील शाळा आणि परदेशातील शाळा यांच्या उपक्र मांची माहिती घेत उपक्र मांची देवाणघेवाण करण्यासाठी ट्विनिंग स्कू ल या संकल्पनेची त्या अंमलबजावणी करत आहेत. या अंतर्गत ग्वाटेमाला या देशातील त्यांची समाज माध्यमातील शिक्षिका मैत्रीण हुदेत सरजाला आणि त्यांच्या विद्यार्थ्यांशी आपल्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन संवाद त्यांनी घडवून आणला. त्यासाठी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचा स्पॅनिश भाषेमध्ये बोलण्याचा तसेच त्या शिक्षिके स विचारण्याच्या प्रश्नांचा सराव करून घेतला. त्यामुळे ऑनलाइन बैठकीच्या वेळी मुलांनी आत्मविश्वासाने आपल्या परदेशातील नवीन मित्र-मैत्रिणींशी संवाद साधला. संवादात त्यांचा देश, तेथील हवामान, सण उत्सव, आहार, चलन, त्यांची शाळा, त्यांचे उपक्र म याची माहिती घेतली. तसेच भारत देशाविषयी आणि आपल्या महापालिका शाळेविषयी विद्यार्थ्यांनी माहिती दिली.

महापालिके च्या विद्यार्थ्यांचा परदेशातील नवीन मित्र आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद हा त्यांच्यासाठी नवीन आणि अविस्मरणीय असा अनुभव होता. या ऑनलाइन बैठकीला शिक्षिका हुदेता आणि त्यांचे विद्यार्थी, भाषांतर करण्यासाठी जॉन मार्टिन, महापालिका शिक्षिका कुं दा बच्छाव, मुख्याध्यापक कै लास ठाकरे आदी उपस्थित होते.

Story img Loader