नाशिक : राज्याच्या सत्ता संघर्षाला कलाटणी देणारा शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे असताना उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तपासणी करण्याव्यतिरिक्त नार्वेकर यांच्या हाती आता काहीही नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… पुरस्कारांमुळे कला निर्मिती करण्याचा आनंद – चित्रकार सुहास बहुलकर यांची भावना; सावाना पुरस्काराने सन्मान

हेही वाचा… भाडे, सुरक्षा ठेव निर्धारण समितीत गाळेधारकांचा प्रतिनिधी घ्या…गाळेधारक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक बाजार समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीनंतर पंचवटी बाजार समिती आवारात झिरवाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. १६ आमदारांच्या अपात्रतेविषयी नार्वेकर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. झिरवाळ यांनी निकाल ठरलेला असून सर्व बाबी १६ आमदारांच्या विरोधात असल्याचे सांगितले. फक्त एकच बाब अध्यक्षांकडे आहे ती म्हणजे तपासणी करायची. सर्वोच्च न्यायालयाने १० ते १२ त्रुटी सांगितल्या. त्या अनुषंगाने तपास करणे एवढेच नार्वेकर यांच्या हाती आहे. आता राजकीय व्यासपीठावर तपास किती दिवस चालतो, हेही त्यांच्या हाती आहे. मात्र यापलिकडे फारसे काही नाही, असे झिरवाळ यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only making investigation on basis of supreme court decision is the only way ahead of rahul narvekar said by narhari zirwal asj