पाटबंधारे विभागाच्या तयारीला वेग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गोदावरी, मुळा, प्रवरा नदीपात्रातील ३६ बंधाऱ्यांमधील फळ्या काढण्याचे काम सुरू झाले असून नदी काठावरील गावांचा वीज पुरवठा खंडित करण्याबरोबरच, पोलीस बंदोबस्ताची तजविज करून शुक्रवापर्यंत जायकवाडीसाठी नाशिक, नगरमधून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

जायकवाडीची तूट भरून काढण्यासाठी नाशिक,नगरमधील धरणांमधून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश झाल्यानंतर नाशिक, नगर पाटबंधारे विभागाने तयारीला वेग दिला. दुष्काळी स्थितीत पाणी सोडले जाणार असल्याने विरोधाची शक्यता गृहीत धरून पोलीस बंदोबस्तात ही कार्यवाही केली जाईल. गोदावरी, मुळा आणि प्रवरा नदीपात्रात एकूण ३६ बंधारे आहेत. त्यातील फळ्या काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एकाचवेळी इतक्या मोठय़ा प्रमाणात फळ्या काढावयाच्या असल्याने त्यास काहीसा वेळ लागेल. भाम, भावली धरणातील पाणी गुरूवारपासून दारणा धरणात आणले जाईल. वहन मार्गात पाणी चोरी होऊ नये म्हणून काठावरील गावांचा वीज पुरवठा बंद करण्यासंबंधी महावितरणशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पाणी सोडण्याची प्रक्रिया ३१ ऑक्टोबपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. पुढील दोन दिवसात सर्व तयारी करून नाशिक, नगरमधील धरणांमधून शनिवापर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, पाणी सोडण्याला विरोध सुरू झाला आहे. शिवसेनेसह मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रामकुंडातील पाण्यात उतरून पाणी सोडण्यास विरोध दर्शविला. भाजपने नाशिकचे पाणी औरंगाबादला पळविल्याचा आरोप करण्यात आला.