येथील यशंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठातर्फे पाच ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या विविध शिक्षणक्र माच्या ऑनलाईन परीक्षेस गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांची चार ते नऊ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन परीक्षा होणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक शशिकांत ठाकरे यांनी दिली.
विद्यापीठाच्या अलिकडेच झालेल्या ऑनलाईन परीक्षेत ८० टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. त्यांच्यासाठी चार नोव्हेंबरपासून पुढील पाच दिवस ऑनलाईन परीक्षा होणार असून यासंदर्भात सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संके तस्थळावर देण्यात आली असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले आहे.