नाशिक – जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झाला नसताना जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन सुरू असल्याचा निषेध करीत या विरोधात जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा भाजपाच्या येवला मतदारसंघ निवडणूक प्रमुख अमृता पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यावर आंदोलन केले. स्थानिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत धरणांमधून विसर्ग केल्यास नांदुरमध्यमेश्वर धरणाचे दरवाजे बंद करण्याचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या संदर्भातील निवेदन अमृता पवार आणि शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना पाठविले आहे. जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या विरोधात संबंधितांनी नांदुरमध्यमेश्वर धरणावर आंदोलन केले. जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. उशिराने पाऊस आल्याने पिके अडचणीत सापडली. शेतीचे उत्पन्न घटणार आहे. पावसाअभावी रब्बी हंगामातील लागवडीवरही परिणाम होणार आहे. जिल्ह्यातील काही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची पाण्याची मागणी वाढणार आहे. मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी खोऱ्यातील वरील भागातील म्हणजे नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. प्रशासनाकडून विसर्गाचे नियोजन सुरू आहे. जायकवाडीला पाणी देण्यास आंदोलकांनी आक्षेप घेतला. स्थानिक पातळीवर बिकट स्थिती असताना पाणी सोडल्यास शेती व शेतीवर आधारीत उद्योग व्यवसाय कोलमडून पडण्याची शक्यता पवार यांनी व्यक्त केली. परिणामी बेरोजगारी वाढून स्थलांतराचे प्रमाणही वाढेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कागदोपत्री आकडेमोडीचे खेळ थांबवून या विषयाकडे गांभिर्याने पाहून शाश्वत उपाययोजना करण्याची गरज आंदोलकांनी मांडली.

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यातील बंद कारखान्यांची आता पडताळणी, अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी महामार्गांवर वाहनांची तपासणी

हेही वाचा – नाशिक : राजकीय केंद्रस्तरीय प्रतिनिधीला अनेक अर्ज सादर करण्याची मुभा, मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

या परिस्थितीत जायकवाडीला पाणी सोडल्यास नाशिक-अहमदनगर आणि मराठवाडा असा पाण्यासाठीचा संघर्ष तीव्र होईल. त्यामुळे चालू हंगामात नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचे नियोजन तत्काळ स्थगित करावे, पाण्यावरून होणारा संघर्ष टाळण्यासाठी दरवर्षीचा आढावा घेऊन पाणी सोडण्याचे सूत्र ठरवावे, जायकवाडीतील बाष्पीभवन व अनियंत्रित अनधिकृत पाणी उपशामुळे होणारा अपव्यय यावर कायमस्वरुपी उपाय योजावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार न करता पाणी सोडल्यास नांदुरमध्यमेश्वर धरणावर पुन्हा दरवाजे बंद करण्याचे आंदोलन केले जाईल, असे पवार यांनी सूचित केले आहे.