लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्याच्या प्रचारासाठी शहरात ५० चौकसभांचे आयोजन करण्याचा निर्णय शहर काँग्रेस सेवादलाच्या बैठकीत घेण्यात आला.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!
nitin Tiwari appreciated nitin Gadkari
काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत नितीन गडकरींचे कौतुक; नागपुरातील उद्धव ठाकरे गटाचे…

नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांमध्ये भ्रष्ट महायुती सरकारने संपूर्ण राज्याचे कसे वाटोळे करून ठेवले, वाढती महागाई, महिलांवरील अत्याचार, शेतमालाला हमीभाव नसणे, वाढती बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, नागरिकांना भूलथापा याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध

काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा घेऊन जनतेसमोर जाण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक प्रमुख आणि १० सदस्य अशी समिती नेमण्यात आली असून मध्य नाशिक विधानसभा प्रमुख म्हणून पोपटराव नागपुरे, सदस्य लक्ष्मण धोत्रे, जगदीश वर्मा, मुकेश त्रिवेदी आदींची निवड करण्यात आली आहे.