नाशिक : पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे १५ ते १७ जून या कालावधीत ‘राष्ट्रीय आमदार संमेलन भारत’चे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच देशातील ४३०० आमदार या संमेलनात एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर विचार विनिमय करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटर येथे हे संमेलन होणार आहे. देशातील सर्व विधानसभांचे अध्यक्ष आणि विधान परिषदांचे सभापती यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे, अशी माहिती माहिती महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील सर्व पक्षातील आमदारांनी या संमेलनात सहभागी होऊन आपल्या लोकशाहीला अधिक सशक्त करण्यास योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आ. सीमा हिरे आणि एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील उपस्थित होते. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल कराड यांनी या संमेलनाची संकल्पना मांडली आहे.

संमेलनात काय होणार?

ल्ल  राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सर्वागीण शाश्वत विकास या त्रिसूत्रीचा उद्देश ठेऊन या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ल्ल  संमेलनात ४० समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहे.

संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन, शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव, कल्याणकारी योजना: शेवटच्या व्यक्तीचे उत्थान, आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि  कौतुकास्पद विधानपद्धती या विषयांवर चर्चा होणार आहे.

ल्ल  कार्य, जीवन संतुलन, यशाची गुरूकिल्ली, आपला मतदारसंघ विकसित करण्याची कला आणि कौशल्य, आपली प्रतिमा तयार करा-साधने आणि तंत्रे, सामाजिक कल्याणासाठी सहयोग- नोकरशहा आणि आमदार या विषयांवरही चर्चा होणार आहे.

ल्ल  प्रत्येक सत्रांमध्ये ५० आमदार चर्चा करणार आहेत. तसेच प्रत्येक सत्राचे अध्यक्षपद विधानसभेचे सभापती, विधानपरिषदेचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता हे भूषविणार आहेत.

ल्ल  राष्ट्रीय आमदार संमेलनात आतापर्यंत भारतातील सर्व राज्यातील एकूण १८०० आमदारांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे. तसेच, एकूण २५०० आमदार येण्याची अपेक्षा आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Organized national mla conference in mumbai in june ysh