धुळे – जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील खोरी, टिटाणे आणि हट्टी भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या गारपीटीमुळे २५० ते ३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. केळी,पपई या फळपिकांसह कांदा, गहू आणि हरभरा ही पिके हातची गेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नाशिक : अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका; द्राक्षांची खुडणी थांबली, तडे जाण्याची भीती

हेही वाचा – धुळे जिल्ह्यात प्रचंड गारपीट

साक्री तालुक्यातील खोरी, टिटाणे भागात सोमवारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे केळी आणि पपई फळबागा उद्ध्वस्त झाल्या. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने फळ उत्पादकांनी शासनाकडे नुकसान भरपाईसाठी मागणी केली आहे. महसूल यंत्रणेने गारपीटग्रस्त भागात तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी २५० ते ३०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. अधिकाधिक नुकसान खोरी व टिटाणे या गाव शिवारात झाले आहे. याशिवाय हट्टी, इंदवे आणि ऐचाळे या गावांमध्ये मध्यम स्वरुपाची गारपीट झाली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 250 hectares of crops damaged due to hailstorm in sakri taluka in dhule ssb