लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमाड : मध्य रेल्वेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात रेल्वे फलाट दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामांसाठी एक आणि दोन जून रोजी ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून मनमाडमार्गे धावणाऱ्या जवळपास २० मेल, एक्स्प्रेस महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात पंचवटी, राज्यराणी, धुळे गाड्यांचाही समावेश आहे.

या मेगा ब्लॉक अंतर्गत गाडी क्रमांक १७६१८ अप नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस ३१ मे आणि एक जून, साईनगर-शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ३१ मे आणि एक जून, डाउन मुंबई-नांदेड तपोवन एक व दोन जून, डाउन मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक व दोन जून, मुंबई-मनमाड-धुळे एक व दोन जून, डाऊन मुंबई-हिंगोली जनशताब्दी एक व दोन जून, मुंबई-मनमाड-पंचवटी एक्स्प्रेस एक जून रोजी रद्द करण्यात आली आहे.

आणखी वाचा-नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदार संख्येत वाढ, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

गाडी क्रमांक १७६१२ डाउन मुंबई-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस. डाउन मुंबई-नागपूर दुरांतो, अमरावती-मुंबई सुपरफास्ट ३१ मे, अप नागपूर-मुंबई दुरांतो गाडी हावडा-मुंबई दुरांतो, अप नांदेड-मुंबई राज्यराणी ३१ जून, मनमाड-मुंबई पंचवटी एक व दोन जून, जालना-मुंबई वंदे भारत दोन जून, अप धुळे-मुंबई एक्सप्रेस एक व दोन जून, डाऊन मुंबई-जालना वंदे भारत, मुंबई-जबलपूर गरीब रथ, डाऊन मुंबई-हावडा दुरांतो, जबलपूर-मुंबई गरीब रथ एक जून रद्द करण्यात आली आहे. मुंबई येथील मध्य रेल्वेच्या फलाट दुरुस्तीच्या कामासाठी ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला असून शुक्रवारी मध्यरात्री हा मेगा ब्लॉक सुरू होणार आहे. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील या महत्त्वपूर्ण जवळपास २० गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध पत्रकारद्वारे दिली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panchavati rajya rani and dhule trains cancelled due to mega block in mumbai mrj
Show comments