नाशिक – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि लेंड हँड इंडिया संस्था यांच्या सहकार्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता पेठरोड येथील एकलव्य निवासी शाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्यात महिंद्रा, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड मॅनेजमेंट मुंबई, युवाशक्ती स्किल इंडिया प्रा. लि., यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स नाशिक, अशा विविध नामांकित कंपन्या आणि संस्था सहभागी होणार आहेत. इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी आदी शैक्षणिक पात्रताधारकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
इच्छुकांनी सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास महास्वयंम गव्ह. इन या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावा. काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२५३-२९९३३२१ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी जितीन रेहमान, सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.