अलीकडच्या काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंनी गैरहजरी लावली होती. अशातच आज ( ११ फेब्रुवारी ) पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांनी एका कारमधून प्रवास केला आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरु झाली आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, भाजपाचे प्रदेश पदाधिकारी संबोधित करणार आहेत. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच कारने आले होते.

हेही वाचा : “मंत्रीपद मिळाल्यावर ९ दारूची दुकानं उघडली, अन् समोर गतिरोधक बसवून…”, अजित पवारांचा भुमरेंना खोचक टोला

“आम्ही एकाच हॉटेलमध्ये थांबलो होतो. माझी कार मागे होती आणि फडणवीसांची कार पुढे लागली होती. त्यामुळे आम्ही एकाच कारमध्ये प्रवास केला,” असं स्पष्टीकरण देत पंकजा मुंडेंनी सांगितलं की, “कोअर कमिटीत असल्याने भाजपाच्या बैठकीत उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदा कार्यकारणी होती. अनेक विषयांवर येथे चर्चा झाली.”

हेही वाचा : “…तर माझ्यासमोर मोदी फार मोठी गोष्ट नाही” प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान; मांडलं विजयाचं नेमकं गणित, थेट आकडेवारीच दिली!

“आगामी काळातील कार्यक्रम, युवा मोर्चा जास्तीत जास्त सक्रिय होत, तरुण वर्ग भाजपाकडे आकर्षित होण्यासाठी काय करावे? यावर चर्चा झाली. तसेच, सरकारचा अभिनंदन ठराव मांडण्यात आला,” अशी माहिती पंकजा मुंडेंनी दिली आहे.