शहरात पांझरा नदीकाठच्या दुतर्फा करण्यात आलेले रस्ते, संरक्षण भिंत, पादचाऱ्यांसाठी बसविलेले पेव्हर ब्लॉक या सर्व विकास कामांचा अक्षरशः बोजवारा उडाल्याने सोमवारी शिवसेनेच्या संतप्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंता आर. आर. पाटील यांना घेराव घातला. यासंदर्भात निवेदनात भूमिका मांडण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील वाहतुकीची गर्दी कमी करण्यासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी पांझरा नदीकाठी दुतर्फा प्रत्येकी पाच किलोमीटरचे रस्ते तयार केले. दुतर्फा संरक्षण भिंत उभारून पादचाऱ्यांसाठीच्या पदपाथवर पेव्हर ब्लॉक टाकले आहेत. निधी अभावी ही कामे रेंगाळल्याचे दिसत आहे. जयहिंद जलतरण तलाव, जुने धुळे भागातील अतिक्रमणामुळे या रस्त्यांची कामे काही ठिकाणी खंडित झाली.

हेही वाचा – नाशिक : इंजिनच्या धडकेत चार रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू

हेही वाचा – जळगाव : देवगिरी महोत्सवाचा समारोप; ‘भाई का बड्डे’ सर्वोत्कृष्ट लघुपट, ‘ये गांव मेरा’ उत्कृष्ट महितीपट

पेव्हर ब्लॉक अनेक ठिकाणी उखडले गेले असून, रस्त्याच्या दुतर्फा लावलेली हजारो किमतीची झाडे पाण्यामुळे वाळू लागली आहेत. मनपातील सत्ताधारी खासदार, आमदार, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वांनी या रस्त्यांकडे दुर्लक्षाची भूमिका घेतली आहे. शहराच्या खासदार,आमदार आणि महापौरांनी अशा कामांसाठी पुढे यावे, या रस्ते कामासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध करून या रस्त्यांचे लवकरच नुतनीकरण करावे, रस्त्यालगतची काटेरी झुडपे तोडून दोन्ही बाजूचे पदपाथ स्वच्छ करावेत, अशी मागणी असलेले निवेदन महापालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना देण्यात आले. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे महानगरप्रमुख धीरज पाटील, सुशील महाजन, भरत मोरे, संदीप सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panzara riverside development works pending thackeray group complaint to engineers dhule ssb