नाशिक – नाशिक रोड भागातील विहितगाव येथे जैविक कचरा इतरत्र टाकल्याबद्दल पारखे क्लिनिकवर २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पद्धती निश्चित आहे. रुग्णालये व दवाखान्यांसाठी मनपाने सुविधाही उपलब्ध केलेली आहे. असे असताना विहितगाव येथे संबंधित क्लिनिकडून जैविक कचरा टाकला गेला. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना कुटे यांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून २५ हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी अन्य कचरा टाकल्यावरही १८० रुपये ते १० हजार रुपयांचा दंड केला जातो. राडारोडा टाकल्यास ८०० रुपये ते आठ हजार रुपये दंडाची रक्कम आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांची साठवणूक विक्री आणि वापर करणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जात आहे.

हेही वाचा – नाशिक : रस्ता २०० किलोमीटरचा, खड्डे बुजविण्यासाठी एक जेसीबी, पाच कर्मचारी, महामार्ग दुरुस्तीची स्थिती

हेही वाचा – नाशिक : ४६ दरडप्रवण क्षेत्रात सतर्कता, जिल्ह्यात ५०० आपदा मित्र कार्यरत, प्रशासनाकडून दुर्गम भागात उपग्रह फोनचा वापर

विहितगाव येथील कारवाईत विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वच्छता निरीक्षक विजय जाधव, सागर बारगळ, तेजस गायकवाड, स्वच्छता मुकादम रनजीत हसराज, आदी उपस्थित होते.