नाशिक – इर्शाळवाडीच्या घटनेनंतर सर्वजण धास्तावलेले असताना इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याचा काही भाग शुक्रवारी ढासळला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्याचा काही भाग हा सह्याद्री पर्वतरांगेत वसला आहे. जिल्ह्यातील ४६ गावे, पाडे दरडप्रवण क्षेत्रात येतात. डोंगर दऱ्यातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावसाळ्यात कायमच भटकंती सुरू राहते. इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ला त्यापैकीच एक होय. शुक्रवारी किल्ल्याचा काही भाग कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. किल्ल्ल्याच्या पायथ्याशी शेतात राहणाऱ्या नागरिकांना गावात सुरक्षितस्थळी जाण्याबाबत सुचित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना आपआपल्या तालुक्यात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर

हेही वाचा – शिरपूरमध्ये चार गावठी बंदुकांसह दोघांविरुध्द गुन्हा

दुसरीकडे, सप्तश्रृंगी गडावरील पहिल्या पायरीनजीकच्या धोकादायक भागाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. समुद्र सपाटीपासून १४८० मीटर उंचीवर असलेले सप्तश्रृंगी गड देवस्थान साडेतीन पीठांपैकी एक असून येथे नियमित १५ ते २० हजार तर वर्षभरात ५० ते ६० लाख भाविक भेट देत असतात. गडावर चार ते पाच हजार स्थानिक लोकसंख्या आहे. सप्तश्रृंगी मातेचे मंदिर हे डोंगरकपारीत असून मंदिर परिसरातील पायऱ्यांवरील रामटप्पा, कासवटप्पा आणि फनिक्युलर ट्राॅली मार्गाच्या परिसरातील काही भाग ठिसूळ झाला आहे. या भागाच्या खाली दुकाने आणि नागरी वस्ती आहे. हा ठिसूळ भाग कोसळला तर नागरी वस्तीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. सप्तश्रृंग गडावर माळीण, इर्शाळवाडीसारखी दुर्घटना होण्याची भीती स्थानिक ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर सप्तशृंग गड ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. काही वर्षांपूर्वी घडलेल्या माळीण दुर्घटनेनंतर सप्तशृंग गडाचा मुद्दा उपस्थित झाला होता, त्यावेळीदेखील ग्रामपंचायतीने पत्र दिले होते. काही महिन्यांपूर्वी सरकारकडून आधुनिक पद्धतीने संरक्षित जाळी गडावर (गर्डर) बसविण्यात आली आहे. मात्र ती कुचकामी आहे. त्यामुळे इर्शाळवाडीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा सप्तशृंग गड चर्चेत आला आहे. गडावरील पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दगडी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

हेही वाचा – नाशिक: आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या युवा मेळावा

कावनई किल्ल्याचा भाग ढासळला असून सुदैवाने कुठलीही जीवित आणि वित्तहानी झालेली नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. विटुर्ली शिवारात दोन घरे आहेत. त्यांना तातडीने गावठाण येथे स्थलांतरित केले आहे. तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने भटकंत्यांनीदेखील टेकडी, किल्ले किंवा धोकादायक ठिकाणे जाणे टाळावे. नागरिकांना काही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच नाशिक जिल्हा पालकमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा. – दादा भुसे (पालकमंत्री, नाशिक)