शहर परिसरात बिबट्यांचा संचार नवीन नसला तरी मानवी वसाहतीत अनाहुतपणे आलेल्या या पाहुण्यासमोर अनेकांनी हिंस्त्र स्वरुपाचे दर्शन घडविले. वडाळा नाका भागातील आयेशानगरात शिरलेल्या बिबट्याला बघायला हजारोंचा जमाव जमला. वन विभागाच्या पथकाने बेशुध्दीचे इंजेक्शन डागल्यानंतर शेकडो जण लाठ्या-काठ्या घेऊन त्याच्यावर धावून गेले. जाळीतून निसटून तो बाजुला पळाला. या दरम्यान बिबट्याने कुणावर हल्ला केला नाही. उलट बिथरलेल्या जमावाच्या तावडीतून बिबट्याला सुरक्षित ठेवताना वन विभाग आणि इको एको फाउंडेशनच्या सदस्यांना शर्थीने प्रयत्न करावे लागले.

बघ्यांची गर्दी, चित्रीकरणासाठी पुढे येणारे भ्रमणध्वनीधारक, लाठ्या-काठ्या हाती घेऊन सरसावलेला जमाव, तटबंदीसाठी कॉलनी रस्त्यांवर उभी केलेली वाहने आयेशानगरमध्ये बिबट्याला पकडताना अडथळे ठरले. त्यामुळे जे काम अर्ध्या तासात झाले असते, त्यासाठी अडीच ते तीन तास लागले. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास सह्याद्री रुग्णालयालगतच्या कॉलनीत बिबट्या दृष्टीपथास पडल्याची माहिती कर्णोपकर्णी पसरली. काही वेळात बघ्यांचे जत्थे जमा होऊ लागले. स्थानिकांनी रस्त्यांवर वाहने आडवी-तिडवी उभी केली. परिणामी, वन विभागाचे बचाव वाहन थेट घटनास्थळी पोहोचू शकले नाही. अर्धा किलोमीटरवर ते उभे करावे लागले. तिथून अवजड लोखंडी पिंजरे उचलून नेण्याची वेळ आली. पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?

हेही वाचा: जळगाव: सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना वैधमापनशास्त्रचा निरीक्षक अटकेत

वन अधिकारी विवेक भदाणे. अनिल अहिरराव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बिबट्याला पकडण्याचे नियोजन केले. इको एको फाउंडेशनचे अभिजित महाले, वैभव भोगले, अरूण अय्यर, सागर पाटील, ऋत्विक पाटील, शंतनू पवार आदींनी पथकाला मदतीची तयारी केली. ब्लो पाईपमधून बेशुध्दीचे इंजेक्शन डागले गेले. सुई लागल्यानंतर बिबट्या काही क्षण गडबडला. नंतर जाळीत अडकला देखील. पण, तो बेशुध्द पडल्याचे समजून शेकडोंचा जमाव लाठ्या-काठ्या घेऊन चालून आला. त्यामुळे हबकलेला बिबट्या जाळीतून निसटला. गर्दीतून मार्ग काढत शेजारील बंगल्यात पळून गेला. जमावाने तिकडे धाव घेतली. वन विभाग आणि स्वयंसेवकांना जमावाच्या तावडीतून बिबट्याला सुखरुप ठेवण्यासाठी धावपळ करावी लागली.

इंजेक्शन टोचल्यानंतर परिणाम होण्यास काही वेळ लागतो. १५ ते २० मिनिटांनी बिबट्या बंगल्याच्या आवारात बेशुध्द झाला. नंतर पथकाने त्याला लोखंडी पिंजऱ्यात नेऊन जेरबंद केले. रात्री १२ वाजता ही मोहीम पूर्णत्वास गेली. सभोवतालच्या गर्दीमुळे बिबट्या बिथरला नाही. यापूर्वीच्या घटनांमध्ये त्याने आसपासच्या लोकांवर हल्ला केल्याची उदाहरणे आहेत. जेरबंद झालेला बिबट्या नर असून तो तीन वर्षाचा आहे. नासर्डी नाला परिसरातून तो या भागात आल्याची शक्यता आहे. इको एको फाउंडेशन आणि पोलीस यंत्रणेच्या मदतीने परिस्थिती योग्य प्रकारे हाताळता आल्याचे वन अधिकारी अहिरराव यांनी सांगितले.

हेही वाचा: जळगाव: धरणगाव तालुक्यातील अपघातात गटविकास अधिकारी जागीच ठार

लाठ्याकाठ्यांची चाल अन् धक्काबुक्की
परिसरात साडे तीन ते चार हजाराचा जमाव असताना तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम सुलभपणे पार पडली. कॉलनीत दडलेल्या बिबट्याला बघण्यासाठी जमावाची अगदी धक्काबुक्कीपर्यंत मजल गेली. त्याची छबी टिपायला भ्रमणध्वनी घेऊन अनेकांची धडपड सुरू होती. जमावाच्या तुलनेत पोलीस, वन विभाग, इको एको फाउंडेशनच्या सदस्यांचे बळ अपुरे होते. अनेकदा विनंती करूनही जमावाने असहकार्याची भूमिका घेतली. बिबट्याला इंजेक्शन मारल्यानंतर शेकडोंचा जमाव लाठ्या-काठ्या घेऊन धावून आला. गर्दीतून कसाबसा मार्ग काढून बिबट्या बंगल्याच्या आवारात पळाला. या काळात त्याने हिंसक रुप धारण केले असते तर अनर्थ घडला असता. पण यावेळी विपरित चित्र दिसले.

Story img Loader