एकाच आठवडय़ात सराफी दुकानासह दोन ठिकाणी चोरी झाल्याने मनमाडकर हैराण झाले असून चोरटय़ांनी पोलिसांना आव्हान दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गजलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक जयशंकर शहाणे यांनी या घटनेची फिर्याध शहर पोलीस ठाण्यात दिली. शहरातील दत्तमंदिर रस्त्यावरील गजलक्ष्मी ज्वेलर्समध्ये शुक्रवारी मध्यरात्री एका शटरचे कुलूप तोडून तर दुसरे शटर वाकवून चोरटय़ांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील चांदींच्या वस्तूंसह रोख असा एकूण २८ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी दुकानाचे संचालक जयशंकर शहाणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दत्तमंदिर रस्ता परिसर दिवसरात्र वर्दळीमुळे गजबजलेला असतो. ही घटना होण्याच्या एक दिवस आधीच पोलिसांनी शहरातील सराफी दुकानदारांची बैठक घेत सुरक्षेबाबत आवाहन केले होते. चारच दिवसांपूर्वी वाघदर्डी रस्त्यावरील शिवाजीनगरात सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज घरफोडीत लंपास करण्यात आला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा