महानगरपालिकेच्या समन्वयाने नाशिक म्युन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत प्रायोगिक तत्वावर व्यावसायिक आणि अनिवासी ग्राहक यांच्यासाठी स्मार्ट पाणी मीटर बसविण्यात येत आहेत. शहरात प्रायोगिक तत्वावर सात हजार, ४४७ स्मार्ट पाणी मीटर तीन ते सहा महिन्यांमध्ये बसविण्याची योजना नाशिक स्मार्ट सिटीने आखली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>धुळे : बहिणीची बदनामी केल्याने युवकाचा खून; मोहाडीतील खूनाचा १२ तासात उलगडा

नाशिकची लोकसंख्या २० लाखांहून अधिक आहे. शहराच्या प्रत्येक भागात पाणी पोहचण्यासाठी महानगरपालिका प्रशासन काम करीत आहे. लोकसंख्येनुसार अपेक्षित पाणी पुरवठा होत असतांना पाण्याचा वापर मात्र मोठ्या प्रमाणावर होत आहे. पाणी वापरासाठी येणारे देयक आणि वापर यात तफावत आढळते. हा भार महापालिकेवर पडतो. दुसरीकडे, वाढत्या पाणी मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि भविष्यातील संभाव्य पाण्याच्या संकटाला तोंड देण्यासाठी स्मार्ट सिटीने आपल्या रहिवाशांना सतत पाणी पुरवठा करता येईल याची खात्री करण्यासाठी पाणी वितरण प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे मनुष्यबळ उपलब्ध करून घेणे, त्यांच्याकडून नोंदणी घेणे यात महापालिकेचा बराचसा वेळ, पैसे खर्च होतात. शिवाय काही तांत्रिक चुकाही होतात. हे टाळण्यासाठी नवीन स्मार्ट पाणी मीटर उपयुक्त ठरले. मीटर रीडिंगमधील विसंगती कमी करणे, देयक देण्याची कार्यक्षमता वाढविणे, पाण्याच्या वापरासंबंधी नियोजनात पारदर्शकता आणण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

नाशिक शहराला जलसंवर्धनाच्या दृष्टीने शाश्वत आणि स्वयंपूर्ण शहर बनविण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असेल, असा विश्वास स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी व्यक्त केला.