लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : शहरातील अद्ययावत मेळा स्थानकातून बससेवा सुरु झाली असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मेळा स्थानक, नवीन सीबीएस, जुने सीबीएस आणि महामार्ग स्थानकावरून सुटणाऱ्या मार्गनिहाय बससेवेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित

मेळा बस स्थानकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतेच लोकार्पण करण्यात आले. मेळा स्थानकातून विनावाहक शिवाई, जनशिवनेरी पुणे , विनावाहक शिवशाही, स्वारगेट, कोल्हापूर, महाबळेश्वर, हुबळी, बेळगांव या वातानुकूलित बस सुरू राहतील. तसेच तळेगांव, भोर, सासवड, फलटण, नारायणपूर, कोरेगांव, सातारा, गोंदवले, मिरज, सांगली, विनावाहक मालेगांव, साधी मालेगांव, धुळे विनावाहक, चाळीसगाव, भडगांव, पाचोरा, जामनेर, धुळे, शिंदखेडा, दोंडाईचा, शहादा, शिरपूर, इंदूर, जळगांव, शेगांव, नागपूर, अकोला, अमरावती, भुसावळ, मुक्ताईनगर, मलकापूर, बुलढाणा, चिखली, खामगांव, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, बऱ्हाणपूर, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगाखेड, यवतमाळ, पुसद, परभणी, अंबड, सिल्लोड, पैठण, येवला, लासलगांव, बुलढाणा, शेवगांव या बस सुटणार आहेत.

आणखी वाचा-अतिक्रमित प्रार्थनास्थळ हटवल्याने अंबडमध्ये वाद

नवीन सीबीएस स्थानकातून त्र्यंबकेश्वर, तोरंगण, पिंपळगाव, इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, सिन्नर, करंजी, कसारा, मनमाड, नांदगाव, बोलठाण, पालघर, सफाळे, बोईसर, डहाणु, जव्हार, खोडा, वघई, वाडा, वसई, वापी, सुरत, अहमदाबाद, वघई या बस सुटतील.

जुन्या सीबीएस स्थानकातून कळवण, सप्तश्रृंगी गड, शिवभांडणे, खिराड, मांगीतुंगी, सुरगाणा, पळसन, बर्डीपाडा, उंबरठाण, खोंबळा, करंजुल, रगतविहीर, खुंटविहीर, लासलगांव, उसवळ, रानवड, पिंप्री, हरसूल, ठाणापाडा, बाफणविहीर, पेठ, कसोली, इंदोले, नंदुरबार, सटाणा, लोणखेडी, म्हसदी, दोंडाईचा, तळवाडे, अंबासन, जायखेडा, साक्री, नवापूर, दहिवेल या बस सुटतील.

महामार्ग बस स्थानकातून मुंबई, बोरीवली, ठाणे, कसारा, नालासोपारा, वसई, अर्नाळा, कल्याण, डोंबिवली, वाशी, उरण, विठ्ठलवाडी, दादर, पनवेल, अलिबाग, मुरूड, रोहा, महाड, दापोली, कोपरगांव, शिर्डी, शनिशिंगणापूर, संगमनेर, अहमदनगर, पंढरपूर, तुळजापूर, लातूर, विजापूर, गुलबर्गा, श्रीगोंदा, पारनेर, शिरूर, बारामती, बीड, श्रीरामपूर, नेवासा, शेवगांव, पैठण, पाथर्डी, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, अंबड, पुसद, यवतमाळ, परभणी, जालना, सटाणा, साक्री, नंदुरबार, अक्कलकुवा, खापर, अमरावती, मालेगांव, धुळे, चोपडा, अंमळनेर, रावेर, शहादा, शिंदखेडा, चिखली, बुलढाणा , यावल यासाठी बस सुटतील. प्रवाश्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

आणखी वाचा-नाशिक : महामार्गावर लुटमार करणारे तीन सराईत ताब्यात

काही बस या वेगवेगळ्या मार्गावरून जाणार आहेत. काही मुंबईमार्गे तर काही वेगळ्या मार्गावरून जात असल्याने एकच ठिकाणची बस ही वेगवेगळ्या ठिकाणावरून सुटत असल्याचे दिसत आहे. यामुळे वाहतुकीला कुठलीही अडचण येणार नाही. उलट, जुन्या बस स्थानका पर्यंत पोहचताना काही मार्गावरून येणाऱ्या बसला अडचणी येत होत्या. वाहतूक कोंडीत भर पडत होती. नव्या फेऱ्यांचे नियोजन सुटसुटीत असून वाहतुकीस अडथळा येणार नाही. -किरण भोसले (विभागीय वाहतूक अधिकारी)

प्रवाशांचा गोंधळ होण्याची शक्यता

मेळा स्थानक कार्यान्वित झाल्याने शहरात चार बस स्थानक झाले आहेत. या चारही स्थानकातून बससेवा सुरु राहणार असल्याने बसफेऱ्यांचे सुटसुटीत नियोजन करण्यात आल्याचा दावा विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असला तरी काही ठिकाणच्या बस या दोन स्थानकातून सुटणार असल्याने नेमके जावे कोणत्या स्थानकात, असा प्रवाशांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, धुळे, मालेगाव, चाळीसगाव, चोपडा, शहादा, शिंदखेडा या बस मेळा तसेच महामार्ग या दोन स्थानकातून सुटणार आहेत. याशिवाय, सटाणा, साक्री, नंदुरबार या बस महामार्ग आणि जुन्या सीबीएस या दोन्ही स्थानकातून सुटणार आहेत.