नाशिक : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन महिन्यांपासून १०८ रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांना जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडून दखल घेण्यात येत नसल्याने बोरगाव घाटमाथा परिसरातील नागरिकांसह आदिवासी आसरा फाउंडेशनतर्फे बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.

बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिका हरवली असल्याचा फलक लावण्यात आला. या फलकाला पुष्पहार घालण्यात आला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर पावसात हे आंदोलन करण्यात आले. बोरगाव हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असल्याने रस्त्यावर वारंवार अपघात होत असतात. गंभीर जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागते. परंतु, १०८ रुग्णवाहिका बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे नसल्याने काही रुग्णांचा उपचाराअभावी मृत्युही झाला आहे. आंदोलनप्रसंगीआसरा फाउंडेशनचे पदाधिकारी सचिन राऊत, पंकज चव्हाण, किरण पवार, हेमंत चव्हाण, दीपक गांगुर्डे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

person who stole jewellery from devotees was arrested in Lalbagh
लालबागमध्ये भाविकांचे दागिने चोरणाऱ्याला अटक, आरोपी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Treatment of dengue patients by lying on the floor in Melghat Chikhaldara Amravati
आरोग्य खात्याचा गलथानपणा, डेंग्यूबाधितांना जमिनीवर झोपवून उपचार
our sentenced to life imprisonment for robbeing Pune District Central Bank branch
पुणे : जिल्हा मध्यवर्ती बंँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांना जन्मठेप
Death mother daughter Gondia, snake bite Gondia,
गोंदिया : सर्पदंशाने मायलेकींचा मृत्यू
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
yavatmal water pipe line scam marathi news
यवतमाळ जिल्ह्यातील जलवाहिनी घोटाळाः उच्च न्यायालयाकडून चौकशीचे संकेत…
navi Mumbai potholes kopar khairane marathi news
नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास

हे ही वाचा…काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन

फाउंडेशनचे सचिव पंकज चव्हाण यांनी, या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास भविष्यात मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. मोहपाडा येथील कणसरा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय दळवी यांनी, कायमस्वरूपी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका हवी आहे. प्रशासन आंदोलन केल्यावर काही दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात रुग्णवाहिका पाठवते. हे नेहमीचे झाले आहे, असा संताप व्यक्त केला.

हे ही वाचा…नाशिक : लाच स्वीकारताना तलाठीस अटक

१०८ रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवा असून नियमित रुग्णवाहिका नसणे गंभीर बाब आहे. याबाबत आमच्या स्तरावरून वरीष्ठ अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी रुग्णवाहिका देण्याबाबतचा मागणी अहवाल सादर करण्यात आला आहे. -रामजी राठोड (तहसीलदार, सुरगाणा)