वाढीव बांधकामासह अतिविशेष सेवांसाठी ३७ कोटींचा निधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रदीर्घ काळापासून अनेक अडचणींना तोंड देणाऱ्या शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाला लवकरच नवीन स्वरूप प्राप्त होणार आहे. रुग्णालयाच्या दोन मजली वाढीव बांधकामास शासनाने मान्यता दिली आहे. त्या अंतर्गत मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागाबरोबर प्रत्येकी ३० खाटांचे मेंदू शस्त्रक्रिया आणि प्लास्टिक सर्जरी या नवीन विभागांची स्थापना करण्यात येणार आहे. अतिविशेष सेवा सुरू करण्यासाठी ३५ कोटींच्या निधीची तजवीज करण्यात आली आहे. या बाबतची माहिती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली

शालिमार परिसरात संदर्भ सेवा रुग्णालय उत्तर महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरवणारे महत्त्वाचे रुग्णालय आहे. रुग्णालय प्रभावीपणे कार्यान्वित राहावे, याकरिता आरोग्य विभागाने कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती. परिणामी, रुग्णालयात कोणतेही छोटे मोठे काम करणेही अवघड झाले होते. बंद पडलेल्या उद्वाहनाची दुरुस्ती असो की वैद्यकीय उपकरणांची दुरुस्ती असो अशी असंख्य कामे रखडल्याने रुग्णांना कमालीचा त्रास होत असल्याकडे विधिमंडळ अधिवेशन, जिल्हा आढावा बैठकीत वारंवार आपण लक्ष वेधल्याचे फरांदे यांनी सांगितले.

आरोग्य मंत्र्यासमोर हा विषय मांडूनही फारसा उपयोग झाला नाही. संदर्भ रुग्णालयाचे दोन मजली वाढीव बांधकाम रखडल्याने नवीन विभाग कार्यान्वित करता येत नव्हते. विधानसभेत या संदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित केल्यामुळे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेऊन हा निधी मंजूर केल्याचे फरांदे म्हणाल्या.

संदर्भ सेवा रुग्णालयात आता मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग कार्यान्वित होणार आहे. त्याच्या बांधकामासाठी एक कोटी ९४ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक, नकाशांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तसेच या रुग्णालयातून अतिविशेष आरोग्य सेवा देण्याकरिता ३५ कोटींचा निधी शासन देणार आहे. शासन निर्णयात ३० खाटांचा बालरोग विभाग आणि १५ खाटांच्या अर्भक अतिदक्षता विभागाचाही उल्लेख असला तरी हे विभाग केंद्र सरकारच्या योजनेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात होणार आहेत. यामुळे त्याऐवजी रुग्णांची निकड लक्षात घेऊन नियोजन केले जाणार आहे. या भरीव निधीतून उपरोक्त विभागांसाठी १३ कोटींच्या वैद्यकीय उपकरणांची खरेदी करण्यात येणार आहे.