नाशिक : महाराष्ट्रात होणारा वेदांता प्रकल्प गुजरातला हलविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प पळविण्याचा घाट घालून मुंबई, महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप माजीमंत्री छगन भुजबळ यांनी केला. ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सर्व महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

हेही वाचा >>> नाशिक : जायकवाडी तुडूंब भरेल इतके पाणी प्रवाहीत ; हंगामात १०४ टीएमसीचा विक्रमी विसर्ग

येवला मतदासंघात विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण पार पडले. यावेळी वेदांता समुहाचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याच्या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केंद्रात जाऊन हा प्रकल्प राज्यात कसा येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. राज्यातील अनेक प्रकल्प दिल्ली, गुजरातला हलविण्यात आले. हे पाहून दुःख होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यासाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले. तेव्हा मुंबई महाराष्ट्रात राहिली आहे. आता याच मुंबई शहराचे महत्त्व कमी करण्याचा डाव सध्या सुरू असल्याचे टीका त्यांनी केली. राज्याच्या बाहेर प्रकल्प गेल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रधानमंत्र्यांकडे जाऊन याबाबत राज्याची भूमिका स्पष्ट करावी. हा प्रकल्प राज्यात कसा येईल, यासाठी प्रयत्न करावे. कारण आता दुसरे कोणी हा प्रकल्प राज्यात पुन्हा आणू शकत नाही. असे सांगत पंतप्रधान हे यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ असे सांगत आहे. हे म्हणजे लहान मुलाला छोटा नाही, मोठा फुगा देतो असे आमिष दाखविण्यासारखे असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plot reduce importance mumbai maharashtra through project chhagan bhujbal allegation ysh