ज्येष्ठ कवी कैलास पगारे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात येणाऱ्या प्रथम पुरस्कारासाठी त्र्यंबकेश्वर येथील कवी संजय दोबाडे यांच्या ‘अजून किती काळ?’ या कविता संग्रहाची निवड करण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १६ ऑक्टोबर रोजी येथील परशुराम साईखेडकर नाटय़गृहात सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे या कार्यक्रमाचे संयोजन होणार आहे. नाशिककरांनी कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे सचिव राजू नाईक, दत्तू तुपे, राजू देसले आदींनी केले आहे.
First published on: 12-10-2015 at 01:00 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poet sanjay dobade got award for his work