नाशिक – पतंगोत्सवात प्रतिबंधित नायलॉन मांजा आणि काचेचा वापर करून निर्मिलेल्या मांजाचा वापर रोखण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेंतर्गत असा मांजा विक्री करणाऱ्या ४२ विक्रेत्यांना शहर पोलिसांनी १५ दिवसांसाठी शहरातून हद्दपार केले. शहरातील रविवार कारंजा आणि मध्यवर्ती भागात पतंग, मांजाची बाजारपेठ आहे. त्यामुळे या भागातील सर्वाधिक २३ विक्रेत्यांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहरात संक्रांतीनिमित्त १५ जानेवारी रोजी पतंगोत्सव साजरा होणार आहे. पतंगोत्सवाचा उत्साह आतापासूनच सर्वत्र दिसत आहे. मागील काही वर्षात पतंगोत्सवात पारंपरिक मांजाऐवजी नायलॉन व काचेचा वापर करून तयार केलेल्या प्रतिबंधित मांजाचा वापर वाढला आहे. या प्रतिबंधित मांजाची विक्री काही जणांकडून छुप्या पध्दतीने केली जात असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. पतंग उडवताना घर्षणाने मांजा तुटतो. इमारती, तारा, झाडे, व रस्त्यांवर अडकतो. अशा तुटलेल्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवितास धोका निर्माण होऊन नागरिकांसह पक्षी, प्राणी यांचे जखमी होण्याचे अथवा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा मांजामुळे शाळकरी मुले व दुचाकीस्वारांचा अपघात होऊन जखमी अथवा मृत्यू झाले आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तारांमध्ये अडकून काही ठिकाणी आगीही लागतात. नायलॉन मांजाचे विघटन होत नसल्याने कित्येक दिवस तो झाडे आणि तारांमध्ये तसाच अडकून असतो. पक्ष्यांसाठी तो जिवघेणा ठरतो.

या पार्श्वभूमीवर, नायलॉन मांजा व काचेचा वापर करून निर्मिलेल्या मांजाची विक्री रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, यांनी परिमंडळ एक आणि दोनमधील पंचवटी, सरकारवाडा, अंबड व नाशिकरोड विभागातील नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेला मांजा विक्री करणाऱ्या एकूण ४२ विक्रेत्यांविरुध्द हद्दपारीची कारवाई केली. सहायक आयुक्त नितीन जाधव यांनी पंचवटी विभागातील सात, डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी सरकारवाडा विभागात २३, अंबड विभागाचे शेखर देशमुख यांनी सहा आणि नाशिकरोड विभागात आनंदा वाघ यांनी सहा विक्रेत्यांवर कारवाई केली.

हेही वाचा : विश्लेषण : संक्रांतीच्या पतंगबाजीत नायलॉन मांजाची दहशत! या जीवघेण्या मांजावरील बंदीला यश का नाही?

प्रतिबंधित मांजा विकल्यास थेट हद्दपार

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर, नाशिक शहरात कुणीही प्रतिबंधीत नायलॉन अथवा काचेचा वापर करून निर्मिलेल्या मांजाची विक्री अथवा वापर करू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत यांनी केले आहे. प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.