लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक आणि चोरीच्या विरोधात महसूलसह पोलीस विभागासोबत उपप्रादेशिक परिवहन विभाग सक्रिय झाला असून, तिन्ही विभागांच्या सुमारे अडीचशे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेल्या संयुक्त पथकांनी थेट नदीपात्रांत उतरुन कारवाई केली. ५३ पेक्षा अधिक ट्रॅक्टर ट्रॉली, १४ डंपर, मालमोटारींसह हजारो ब्रास वाळूसाठा जमा केला.

जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेताच आयुष प्रसाद यांनी अवैध वाळू वाहतूक व चोरी रोखण्याबाबत सूतोवाच केले होते. वाळूतस्करी रोखण्यास आपली प्राथमिकता असेल, असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले होते. याअनुषंगाने मध्यंतरी जळगावसह जिल्हाभरात काही प्रमाणात कारवाई करण्यात आली होती.

आणखी वाचा-नंदुरबार: बिरसा मुंडा रस्ता जोड योजनेतून १७ जिल्ह्यांत रस्ते निर्मितीचे नियोजन

आता अवैध वाळू वाहतूक व चोरी रोखण्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभागासोबत उपप्रादेशिक परिवहन विभाग सक्रिय झाला असून, नाशिक येथील महसूल खात्याच्या पथकासोबत स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी थेट गिरणा नदीपात्रात उतरले. परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, चाळीसगावचे अप्पर अधीक्षक रमेश चोपडे, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रावले यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे निरीक्षकांसह महसूल व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांचा फौजफाटा नदीपात्रात उतरला होता. या संयुक्त कारवाईत वाळू तस्करांना जोरदार दणका देण्यात आला. पोलिसांनी अनेक वाळू वाहून नेणारी वाहने जमा केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police active against illegal sand transport 67 vehicles accumulated in jalgaon mrj