लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: इगतपुरी शहरातील कुख्यात गुंड ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून संशयितांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इगतपुरी शहरात कुख्यात डेव्हिड गँगच्या वतीने दहशत पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. संजय धामणे याचा खून या टोळीतील लोकांकडून झाला. पोलीस या टोळीच्या मागावर असताना टोळीतील जॉन पॅट्रीक मॅनवेल उर्फ छोटा पापा, अजय पॅट्रीक मॅनवेल (रा. गायकवाड नगर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. इगतपुरी शहर परिसरात सर्वसामान्य नागरिक तसेच रेल्वे स्थानक परिसरात स्टॉलधारक, व्यवसायिकांमध्ये या टोळीच्या गुंडांनी दहशत पसरवली. या टोळीतील दोघांवर खूनाचा प्रयत्न, खून, दरोडा, जबरी लुटमार, चोरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.