पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून ३४ वर्षाच्या युवकाने आत्महत्या केली. याप्रकरणी संशयित पत्नी आणि तिच्या प्रियकराविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नाशिक : जळगावात दोन अपघातांत तीन तरुणांचा मृत्यू

अंबड पोलीस ठाण्यात राकेश उर्फ राधेशाम वैष्णव-बैरागी बेपत्ता म्हणून नोंद होती. दोन दिवसानंतर गंगापूर पोलिसांना बापू पुलाजवळ एक मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला, चौकशी केली असता राकेश उर्फ राधेशाम यांचाच तो मृतदेह असल्याचे उघड झाले. मृतदेह मिळाल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. गंगापूर पोलिसांनी तपासात काही आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन नातेवाईकांना दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

हेही वाचा- जळगावातून फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरु होणार

गंगापूर पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असता पत्नीचा प्रियकर आणि स्वतः पत्नी हे पतीला मानसिक त्रास देत असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे कळल्यापासून राकेश मानसिक तणावात होता. पत्नी आणि तिचा प्रियकर राकेशला त्रास देऊ लागल्याने त्याने आत्महत्या केल्याची पोलिसांची माहिती आहे. राकेशची पत्नी आणि तिचा प्रियकर रिझवान मन्सुरी यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police custody of wife and her lover in youths suicide case in nashik dpj