नाशिक – सिडकोतील गुन्हेगारीचा वाढता आलेख लक्षात घेऊन अंबड पोलिसांनी समाजकंटकांना धडा शिकविण्यासाठी ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. नोंदीतील १२ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून ५४ गुन्हेगारांना तडीपार करण्याचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहरात सर्वत्र काही महिन्यांपासून गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. रस्त्यावर लुटमारीचे प्रकारही घडत आहेत. याविरुध्द सर्वसामान्यांसह राजकीय पक्षही आवाज उठवू लागल्यानंतर पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीतल सिडको भागात गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही सुरु केली आहे. अंबड पोलिसांनी दीड महिन्यात सामाजिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे आणि नोंदीवरील १२ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. २२ गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पोलीस आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहेत. १० गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकूण ५४ गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांनी दिली. पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा >>> मालेगाव बाजार समितीवर ठाकरे गटाचा झेंडा; सभापतिपदी अद्वय हिरे, उपसभापती विनोद चव्हाण

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडको, खुटवडनगर, उंटवाडी, कामटवाडे, डिजीपीनगर, चुंचाळे, अंबड लिंक रोड, अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत परिसर आहे. अंबडगाव, अंबड औद्योगिक वसाहत, तसेच चुंचाळेसाठी पोलीस ठाणे समकक्ष स्वतंत्र चौकी निर्माण करण्यात आली आहे. सिडको आणि परिसरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत .यात दोनपेक्षा जास्त गुन्हे असणारे गुन्हेगार तसेच सामाजिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे गुन्हेगार तसेच पोलिस नोंदीत असलेले गुन्हेगार यांची माहिती जमा करून त्यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. यासाठी पोलिस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र विभाग स्थापन करून माहिती संकलीत केली जात आहे अंबड पोलिसांनी दीड महिन्यात १२ गुन्हेगारांचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आल्यावर आयुक्त कार्यालयाकडून प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. प्रस्तवा मंजुरीनंतर अंबड पोलिसांनी १२ गुन्हेगारांना नाशिकबाहेर इतर जिल्ह्यात रवाना केले. अंबड पोलिसांनी या नंतर २२ गुन्हेगारां तडीपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पोलीस आयुक्तांकडे पाठविले आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास २२ गुन्हेगारांना तडीपार केले जाईल.