नाशिक – शहराची भ्रमणध्वनी बाजारपेठ असलेल्या महात्मा गांधी रस्त्यावरील दुकांनावर गुन्हे शोध पथकाने सोमवारी कारवाई करुन मुद्देमाल हस्तगत केला. सायंकाळी उशीरापर्यंत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईनंतर बाजारपेठेतील बहुसंख्य दुकाने बंद करण्यात आल्याने ग्राहकांची गैरसोय झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नाशिक : चिंचवेजवळ बसची मोटारीला धडक; सर्व प्रवासी सुखरूप

शहरातील अशोक स्तंभ, महात्मा गांधी रस्ता, घनकर गल्लीत भ्रमणध्वनीची अनेक दुकाने आहेत. या ठिकाणी भ्रमणध्वनी तसेच संंबंधित सर्व साहित्य मिळते. भ्रमणध्वनी मार्केट अशी या भागाची ओळख झाली आहे. कमी किंमतीत ग्राहकांना विविध पर्याय मिळत असल्याने या ठिकाणी जिल्हाभरातून ग्राहकांची वर्दळ सातत्याने असते. या ठिकाणी काही दुकानदार नामांकित कंपनीच्या नावाने बनावट सामानाची विक्री करीत असल्याच्या तक्रारी वारंवार होतात. अशा तक्रारी आल्यावर पोलिसांकडून कारवाई करुन मुद्देमाल जप्त केला जातो. अधूनमधून पोलिसांची कारवाई भ्रमणध्वनी बाजारपेठेसाठी आता सरावाची झाली आहे. सोमवारी आयफोन या प्रसिध्द कंपनीचा बनावट माल विकला जात असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी काही दुकानांवर छापे टाकले. संबंधित कंपनीचे बोधचिन्ह तसेच अन्य सामान बनावट असल्याचे या कारवाईत आढळून आले. ग्राहकांना ते विकलेही जात होते. या कारवाईच्या वेळी कंपनीचे पदाधिकारीही उपस्थित होते. सायंकाळी उशीरापर्यंत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई झाल्यानंतर तेथील भ्रमणध्वनी दुकानदारांनी तातडीने दुकाने बंद केली. यामुळे आलेल्या ग्राहकांना परत फिरावे लागले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police raid on shops selling duplicate part of famous mobile phone company zws