भेसळयुक्त दुधाचे पदार्थ बनविणाऱ्यांवर कारवाई केली म्हणून जिल्हा दुग्ध विकास अधिकारी तथा भेसळ निर्मूलन समितीचे सदस्य डॉ. अमित पाटील यांना दमदाटी करणाऱ्या चौघांविरुद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी रात्री डॉ. अमित पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गाईच्या दुधात ०५.५ टक्के भेसळ करून अपायकारक पदार्थ बनविले म्हणून बारकू पाटील (रा.वाडीभोकर, ता.धुळे) याच्याविरुध्द कारवाई करण्यात आली. यामुळे संतापलेल्या बारकूसह संदीप पाटील, पुपेंद्र पाटील (दोन्ही रा.गोंदूर, ता. धुळे)  तसेच अन्य एका अनोळखी व्यक्तींनी डॉ. पाटील यांना दमदाटी केली. या तक्रारीवरुन पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा