Lalit Patil Breaking News in Marathi : ससून रुग्णालयातून पळून गेलेला अमली पदार्थ व्यापार केल्याचा आरोप असलेला ललित पाटीलच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तामिळनाडूतील चेन्नई येथून त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलीय. त्याची आता चौकशी करण्यात येणार आहेत. ललित पाटील फरार झाल्यापासून त्याच्याशी संबंधित सर्व लोकांची पोलिसांकडून चौकशी सुरू होती. यादरम्यान, पोलिसांनी ललितच्या नाशिक येथील घरीही तपासणी केली होती. पोलीस सातत्याने ललितच्या घरी जाऊन या प्रकरणाची चौकशी करत होते. यावरून ललितच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
“आम्ही जन्म दिला त्याला, हा आमचा गुन्हा आहे का? आम्ही काय केलंय असं? आई-बापांनी जन्म दिला हा गुन्हा नाहीय ना. मी फार टेन्शनमध्ये आहे. तो तीन वर्षांपासून तुरुंगात आहे. आम्ही त्याला भेटायला गेलो नाही, असं ललितचे वडील म्हणाले. ललितचे वडील गेले काही दिवस आजारी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
हेही वाचा >> “ललितने कोणता मोठा गुन्हा केलाय?”, आईचा सवाल; म्हणाल्या, “त्याला फसवलं गेलंय, त्यामुळे…”
ते पुढे म्हणाले की, “पोलीस येथे येऊन आम्हाला त्रास देत आहेत. मला लहान लहान नातू आहेत, त्यांना म्हणतात तुमची जिंदगी बरबाद झाली. असं म्हणायची काय गरज आहे का?”, असा आर्त सवाल ललितच्या वडिलांनी केला आहे.
आईनेही केला सवाल
“ते जे निर्णय घेतील तो घेतील. पण त्याने काही मोठा गुन्हा केला नाहीय. त्यामुळे त्याचं एन्काऊटर करण्याचं काहीच कारण नाही. एवढे मोठे मोठे गुन्हे करतात ते सुटतात आणि फिरतात. मग ललितने काय केलंय असं? त्यामुळे त्याचा एन्काऊंटर करू नका. त्याच्या मागे दोन मुलं आहेत. आई-वडिल आहेत”, असं ललित पाटीलच्या आई म्हणाल्या.
“त्याला फसवलंय हे त्याने सांगावं. जे शिक्षा देतील त्याला सामोरं जावं. तो फसला गेलाय त्यामुळे तोही घाबरून गेला असेल. मुंबई पोलिसांनी त्याला पकडलंय त्यामुळे त्याने सांगावं की त्याला फसवलं गेलंय. पैशांसाठी त्याला टॉर्चर केलं गेलं. म्हणून त्याने पलायन केलं. राजकारणीही तेच म्हणत आहेत की त्याने एवढा काय गुन्हा केलाय. त्याचं हर्नियाचं ऑपरेशन होणार होतं. त्याला चेकअपला नेलं असताना डॉक्टर म्हणाले की आज ऑपरेशन केलं आणि उद्या तुला नेलं तर तू जगू शकणार नाही. म्हणून तो घाबरून निघून गेला”, असंही त्या म्हणाल्या.
मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापासून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी राजकीय नेत्यांनी मदत केल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. तर, ससून रुग्णालय प्रशासनालाही धारेवर धरण्यात आलं. त्यामुळे या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला. पंधरा दिवसांपासून फरार असलेल्या ललितला अखेर पोलिसांनी तमिळनाडूतील चेन्नई येथून अटक केली. त्यामुळे आता अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.