नाशिक – कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक आणि पोलीस शिपाई हे १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
हेही वाचा – दोन महिलांचा विहिरीत पडून मृत्यू
हेही वाचा – चाळीसगावमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
तक्रारदाराविरुद्ध अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज आहे. चौकशीत गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक निरीक्षक नितीन शिंदे (३९) आणि शिपाई कुमार जाधव (४२) यांनी तक्रारदाराकडे तडजोडीत १० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर शिपाई जाधव यास अभोणा पोलीस ठाण्यात लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.