सहकार क्षेत्रात जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेनंतर सर्वांत मोठ्या असलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (विकास) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. निवडणुकीच्या मैदानात आता दिग्गज उतरल्याने रणधुमाळी आता रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. दिग्गजांच्या सहभागाने सहकार क्षेत्र मात्र ढवळून निघाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>जळगाव : ग्रामपंचायत निवडणूक वादातून युवकांची हत्या करणाऱ्या दाम्पत्यास जन्मठेप

विशेष बाब म्हणजे आजपर्यंत सहकार क्षेत्रापासून दोन हात दूर राहणारे पालकमंत्री स्वत: निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून, ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्यासह अन्य मातब्बर नेतेदेखील हाच कित्ता गिरवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यातील हालचाली निवडणुकीची दिशा ठरवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दूध संघासाठी जळगावपासून मुंबईपर्यंत रणनीती आखली जात आहे.

हेही वाचा >>>नाशिकमध्ये हर हर महादेव चित्रपटावरून राष्ट्रवादी-मनसेत संघर्ष

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस मिळून महाविकास आघाडी, तर भाजप व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) युतीत लढत होण्याची शक्यता आहे. दोन्हींकडून बैठकांंचा धडाका सुरू झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्यासारख्या दिग्गजांचा अर्ज भरलेल्या मध्ये समावेश आहे. गुरुवारी शेवटच्या दिवशी पॅनलचे चित्र स्पष्ट होणार आहे. मंदाकिनी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही सर्वच जण उमेदवारी अर्ज भरणार आहोत.

हेही वाचा >>>नाशिक : अश्लील लघूसंदेश, चित्रफित पाठविल्यावरून चुलत भावाचा खून

दरम्यान, दूध संघावर आमदार एकनाथ खडसे गटाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, दूध संघाच्या चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यात घमासान सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्ता स्थापन झाल्यानंतर दूध संघात अपहार व चोरीच्या घटनांबाबत पोलीस ठाण्यात गुहे दाखल झाले आहेत. दूध संघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाकडून दोन्ही मंत्र्यांचा कस लागणार आहे, तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस यांची मिळून महाविकास आघाडीही मैदानात उतरली आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व खडसे यांच्याकडेच असणार आहे. त्यामुळे ही सत्ता राखण्याचे मोठे आव्हान खडसे यांच्यासमोर असणार आहे.

हेही वाचा >>>नाशिकमध्ये हर हर महादेव चित्रपटावरून राष्ट्रवादी-मनसेत संघर्ष

दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या मैदानात आता पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील हे उतरले आहेत. सोमवारी (७ नोव्हेंबर) त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दूध संघाच्या संचालकांच्या वीस जागांसाठी दहा डिसेंबर रोजी मतदान, तर अकरा डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

गुरुवारपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत
गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत आहे. शुक्रवारी उमेदवार अर्जांची छाननी होणार आहे. चौदा नोव्हेंबर रोजी वैध उमेदवारी अर्ज जाहीर करण्यात येणार आहे. चौदा ते अठ्ठावीस नोव्हेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. एकोणतीस नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवारांची यादी व चिन्हवाटप करण्यात येणार असून, दहा डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होईल. अकरा डिसेंबर रोजी सकाळी आठपासून मतमोजणी होईल.

मतदारसंघनिहाय जागा
मतदारसंघनिहाय जागा खुला प्रवर्ग (तालुकानिहाय)-पंधरा, महिला राखीव-दोन, इतर मागास प्रवर्ग-एक, अनुसूचित जाती-जमाती-एक, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मार्गास प्रवर्ग-एक अशा मतदारसंघनिहाय वीस उमेदवार असतील.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political preparations for election of board of directors of district cooperative milk producers union begin amy
Show comments