लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: भाजपच्यावतीने नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मंगळवारी आडगांव नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ते पंचवटी कारंजा अशी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. सावरकर स्मारक येथील सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात ठिकठिकाणी निघणाऱ्या यात्रेत शिवसैनिक सहभागी होत आहेत. नाशिकमध्ये मात्र भाजपकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांना दूर ठेवल्याचे दिसून आले. यात्रेच्या शुभारंभावेळी सेनेचे निवडक पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ते गायब झाले. यात्रेवर भाजपचा प्रभाव ठळकपणे पहायला मिळाला.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Supriya Sule comment on BJP, Supriya Sule,
१६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका
thane city BJP president JP Nadda, walk out of the Gurdwara
Video : …आणि गुरुद्वारातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना काढता पाय घ्यावा लागला

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसकडून केली जाणारी विधाने बघता जनतेला सावरकर यांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी भाजपने राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा काढण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार नाशिक पूर्वमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.

आणखी वाचा- नाशिक: पाणी नियोजनासाठी अनोखी शक्कल, विहीरीचा वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार

यात्रेत सावरकरप्रेमींनी भगव्या रंगाच्या मी सावरकर लिहिलेल्या टोप्या परिधान केलेल्या होत्या. मार्गात गुलाब पाकळ्यांची उधळण करून रांगोळया काढून तसेच फटाके फोडत यात्रेचे स्वागत करण्यात येत होते. हाती भगवे ध्वज घेऊन नागरिक सहभागी झाले. विविध प्रकारच्या घोषणा देत सावरकरांचा जयजयकार करण्यात आला. यात्रेचा समारोप पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला.

यात्रेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आ. राहुल ढिकले, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव यांच्यासह युवा मोर्चा, पंचवटी, तपोवन मंडल व महिला मोर्चाच्या पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गौरव यात्रेवर भाजपचा प्रभाव राहिला. शिवसैनिक दृष्टीपथासही पडले नाही. यात्रेचा शुभारंभ आडगाव नाका येथे झाला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, योगेश बेलदार, रुपेश पालकर, अमोल सूर्यवंशी यांच्यासह अन्य काही पदाधिकारी उपस्थित होते. सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर श्रीफळ वाढवून यात्रेचा शुभारंभ झाला. यात्रेला सुरूवात झाल्यानंतर सेनेचे पदाधिकारी निघून गेले. यात्रेसाठी बराच वेळ आधीपासून ते आलेले होते. नंतर महावीर जयंती, अयोध्या दौरा नियोजन अशी कामे असल्याने सेना पदाधिकारी निघून गेले. गौरव यात्रेसाठी शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना भाजपकडून निरोपही पाठविले गेले नसल्याचे सांगितले जाते.

मुळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गौरव यात्रेची घोषणा करतानाच यात्रेत शिवसेनेचे मुख्यमंत्री. मंत्री व शिवसैनिकही सहभागी होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार अनेक ठिकाणी शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी, शिवसैनिक यात्रेत सहभागी होत आहेत. नाशिकमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसले. वेगवेगळ्या विभागासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आल्याचे बावनकुळे यांनी म्हटले होते. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील यात्रेची संपूर्ण तयारी भाजपने केली होती. या प्रक्रियेत शिवसेना अर्थात शिंदे गटाला दूर ठेवले गेले. भाजपकडून यात्रेबद्दल निरोप येण्याची प्रतीक्षा न करताच काही सेना पदाधिकारी स्वत:हून यात्रेत काही काळ सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही शिवसेना-भाजपची आहे. मंगळवारच्या गौरव यात्रेविषयी भाजपकडून सेना पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात आले होते. यात संवादाचा काही अभाव राहिला असल्यास माहिती घेतली जाईल. पुढील वेळी असे घडणार नाही याची काळजी घेतली जाईल. -गिरीश पालवे (शहराध्यक्ष, भाजप)