लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये स्थानिक कांदा आणि डाळिंब व्यापाऱ्यास लाखो रुपयांना परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून फसविण्यात आले असून संशयितांविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
tigress latest marathi news
महाराष्ट्रातून ओडिशात सोडलेली वाघीण झारखंडमध्ये
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा

बागलाण तालुक्यातील संदीप देवरे (३८) हे फळ व्यापारी आहेत. संशयित जसिम शेख (रा. पश्चिम बंगाल) याने देवरे यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून डाळिंब खरेदी केले. यासाठी २१,७९,३८३ रुपये रक्कम ठरली. डाळिंब खरेदीनंतर शेखने पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देवरे यांनी सटाणा पोलीस ठाण्यात शेखविरूध्द तक्रार दिल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी वाचा-बाळ बदलप्रकरणी ११ जणांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

दुसरी घटना सिन्नर तालुक्यात घडली. मुकेश दराडे (४४, रा. नांदुरशिंगोटे) हे कांदा व्यापारी आहेत. त्यांनी तेलंगणा येथील अनुसाई ट्रेडर्स कंपनीचे शेख बाबु यांच्याशी साई सन्मान फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत व्यवहार केला. यासाठी १० लाख ४७ हजार १६५ रुपये ठरले. यातील तीन लाख, ३२ हजार ९३५ रुपये दराडे यांना देण्यात आले. उर्वरीत सात लाख, १४ हजार २२७ रुपये संशयिताने दिले नाही. फसवणूक झाल्याचे दराडे यांच्या लक्षात येताच वावी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader