लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: रानडुक्करांच्या वाढत्या उपद्रवामुळे देवळा तालुक्यातील दहिवड येथील शेतकऱ्याच्या डाळिंब बागेचे नुकसान झाले असून वन विभागाने रानडुक्करांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दहिवड येथील सुनील आणि अनिल शिंदे यांची वाखारी रस्त्यावरील सिंधओहळ शिवारात डाळिंब बाग आहे. शिंदे यांच्या डाळिंब बागेला चांगल्या प्रकारे बहर आला असून रानडुक्करांनी आपला मोर्चा या डाळिंब बागेकडे वळविला . काढणीला आलेल्या डाळिंब फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. दहिवड परिसरात रानडुक्करांच्या वाढत्या उपद्रवामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. आधीच कांद्यासह इतर शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना दुसरीकडे रानडुकरांमुळे होत असलेल्या नुकसानामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे.

हेही वाचा… दिंडोरीत सफरचंद लागवडीच्या प्रयोगाला यश

वन विभागाने नुकसानीची दखल घेऊन रानडुक्करांचा बंदोबस्त करावा, नुकसानग्रस्त बागेची पाहणी करून पंचनामा करावा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिकूल परिस्थितीत एक एकरात डाळिंब बागेची लागवड केली आहे. एकूण १२० झाडे असून, अत्यंत मेहनतीने बाग वाढवली आहे. यासाठी हजारो रुपये खर्च केला आहे. बागेला चांगल्या प्रकारे बहर आला असून, काढणीला आलेल्या या बागेत रानडुक्करांनी झाडे आणि फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. याचा पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळावी. – अनिल शिंदे (डाळिंब उत्पादक, दहिवड)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pomegranate orchards have been damaged due to wild boars in nashik forest department should deal with the wild boars demanded by farmer dvr
Show comments